फोटो सौजन्य - सोशल मीडिया
भारतीय कुस्ती संघटनेचे अध्यक्ष संजय सिंह : खेळ आणि राजकारण यांच्यामध्ये सध्या प्रचंड वाद सुरु आहेत. भारतामध्ये खेळामध्ये राजकारण होत असल्यामुळे वाद चिघळत चालले आहेत. अलीकडेच भारताचा टोकियो कांस्यपदक विजेता बजरंग पुनिया आणि विनेश फोगट यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश केला आणि वादाला पालवी फुटली आहे. त्यानंतर लगेचच काँग्रेसने हरियाणा विधानसभेसाठी बजरंग पुनिया आणि विनेश फोगट यांना उमेदवार म्हणून घोषित केले. मात्र, आता भारतीय कुस्ती संघटनेचे अध्यक्ष संजय सिंह यांचे वक्तव्य चर्चेत आले आहे. संजय सिंह यांनी बजरंग पुनिया आणि विनेश फोगट यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत.
भारतीय कुस्ती संघटनेचे अध्यक्ष संजय सिंह यांनी सांगितले की, बजरंग पुनिया आणि विनेश फोगट यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. यावरून दोघेही पैलवानांच्या निषेधामागे होते हे सिद्ध होते. संजय सिंह म्हणाले की, ब्रिजभूषण शरण सिंह हे भारतीय जनता पक्षाशी संबंधित होते, मी कोणत्याही पक्षाशी किंवा व्यक्तीशी संबंधित नाही, पण त्यांनीही मला विरोध केला… त्यामुळे हा संपूर्ण विरोध राजकीय हेतूने प्रेरित होता. त्यांनी विरोध करायला सुरुवात केली आणि ब्रिजभूषण शरण सिंह यांनी कुस्तीपासून दुरावले, त्यामुळे हा मुद्दा तिथेच संपायला हवा होता, पण तो राजकीय हेतूने प्रेरित होता आणि त्यामागे काँग्रेसचा हात होता.
#WATCH | On Vinesh Phogat and Bajrang Punia joining Congress, Sanjay Singh, President of the Wrestling Federation of India (WFI) says, “…They joined the Congress, so this proves that they were behind that protest. Brij Bhushan Sharan Singh was associated with BJP, I am not… pic.twitter.com/v7HEsBNXn0
— ANI (@ANI) September 7, 2024
भारतीय कुस्ती संघटनेचे अध्यक्ष संजय सिंह यांनी महिला कुस्तीपटू साक्षी मलिकवर प्रतिक्रिया दिली. खरे तर बजरंग पुनिया आणि विनेश फोगट यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला, मात्र आतापर्यंत साक्षी मलिकने स्वत:ला राजकारणापासून दूर ठेवले आहे.