फोटो सौजन्य - BCCI/England Cricket
भारत विरुद्ध इंग्लंड : T-२० विश्वचषक २०२४ आता अंतिम टप्प्यात आहे. आज भारतीय वेळेनुसार सकाळी विश्वचषकाचा पहिला सेमीफायनलचा सामना पार पडला. हा सामना अफगाणिस्तान दक्षिण आफ्रिका यांच्यामध्ये खेळवण्यात आला. या सामन्यांमध्ये दक्षिण आफ्रिकेच्या संघाने विजय मिळवून अंतिम फेरीमध्ये प्रवेश केला आहे. आज २७ जून रोजी भारतीय वेळेनुसार रात्री ८ वाजता हा सामना होणार आहे. या सामन्याचे आयोजन प्रोव्हिडन्स स्टेडियमवर हा सामना खेळवला जाणार आहे. इंग्लंडच्या संघाने सुपर-८ मध्ये अमेरिकेचा १० विकेट्सने विजय मिळवून उपांत्य फेरीमध्ये प्रवेश केला आहे. तर भारताच्या संघाने ऑस्ट्रेलियाच्या संघाला पराभूत करून उपांत्य फेरीमध्ये प्रवेश केला.
T२० विश्वचषक २०२४ चा दुसरा सेमीफायनलचा सामना भारत आणि इंग्लंड यांच्यात 27 जून रोजी होणार आहे. हा सामना गयाना येथील प्रोव्हिडन्स स्टेडियमवर खेळवला जाणार आहे.
भारत आणि इंग्लंड यांच्यात T२० विश्वचषक २०२४ चा दुसरा उपांत्य सामना २७ जून रोजी होणार आहे. हा सामना भारतीय वेळेनुसार रात्री ८ वाजता टेलिव्हिजनवर किंवा मोबाईलवर या सामन्याचे थेट प्रक्षेपण होणार आहे.
या सामन्याचे थेट प्रक्षेपण स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवर तुम्ही भारत विरुद्ध इंग्लंड विश्वचषक २०२४ च्या दुसऱ्या उपांत्य फेरीच्या सामन्याचे थेट प्रक्षेपण वेगवेगळ्या भाषांमध्ये पाहू शकता. त्याचबरोबर मोबाईलवर जर तुम्हाला पाहायचे असेल तर चाहते डिस्ने + हॉटस्टार ॲपवर T२० विश्वचषक २०२४ च्या दुसऱ्या उपांत्य फेरीच्या सामन्याचे थेट ऑनलाईन स्ट्रीमिंग पाहू शकतात.
रोहित शर्मा (कर्णधार), हार्दिक पंड्या (उपकर्णधार), यशस्वी जैस्वाल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), संजू सॅमसन (यष्टीरक्षक), शिवम दुबे, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, युजवेंद्र यादव चहल, अर्शदीप सिंग, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज.
फिल सॉल्ट, जोस बटलर (यष्टीरक्षक/कर्णधार), जॉनी बेअरस्टो, मोईन अली, हॅरी ब्रूक, लियाम लिव्हिंगस्टोन, सॅम करन, जोफ्रा आर्चर, आदिल रशीद, मार्क वुड, रीस टोपले, बेन डकेट, विल जॅक, टॉम हार्टले, ख्रिस जॉर्डन.






