प्लेऑफची रंगत : आयपीएल 2024 चे साखळी सामने पूर्ण झाले आहेत त्यामुळे आता कोणता संघ कोणत्या संघाशी लढणार हे जाणून घेण्याची प्रत्येक क्रिकेट चाहत्याला उत्सुकता आहे. राजस्थान रॉयल्स आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यातील सामना रद्द झाल्यामुळे आयपीएल लीगचे आता साखळी सामने संपले आहेत. त्याचबरोबर आयपीएलच्या प्लेऑफसाठीचे संघ निश्चित झाले आहेत. आता प्लेऑफ फेरी सुरू होणार आहे. यामध्ये पहिला प्लेऑफचा सामना कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद यांच्यामध्ये क्वालिफायर 1 चा सामना होणार आहे.
[read_also content=”विराट कोहलीने ख्रिस गेलला दिली खास भेटवस्तू https://www.navarashtra.com/sports/virat-kohli-gave-a-special-gift-to-chris-gayle-535488.html”]
एलिमिनेटर सामना राजस्थान रॉयल्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू यांच्यातील एलिमिनेटर सामनाही याच ठिकाणी होणार आहे. आयपीएल 2024 च्या सुरुवातीला राजस्थान रॉयल्सने गुणतालिकेमध्ये दीर्घकाळ वर्चस्व गाजवले. राजस्थान रॉयल्सची मोहीम साखळी टप्प्यात 4 पराभवांनी संपुष्टात आली. राजस्थान रॉयल्सला गुवाहाटीमध्ये पावसामुळे आपले वर्चस्व राखता आले नाही आणि त्यांचा पुढे जाण्याचा प्लॅन फसला. कोलकाता नाईट रायडर्स लीग टप्प्यात 14 सामन्यांत 20 गुणांसह गुणतालिकेत पहिल्या स्थानावर आहे, तर सनरायझर्स हैदराबाद 17 गुणांसह दुसऱ्या स्थानावर आहे. राजस्थान रॉयल्सचे 17 गुण आहेत परंतु त्यांचा रनरेट कमी असल्यामुळे त्यांना तिसऱ्या स्थानावर समाधान मानावे लागले. आरसीबीने चेन्नईला मागे टाकले आणि नेट रन रेटच्या आधारे चौथे स्थान मिळवले.
Next Stop ? Ahmedabad! ✈️
????????? ? calling ??
Kolkata Knight Riders ? Sunrisers Hyderabad#TATAIPL | #KKRvSRH | #Qualifier1 | @KKRiders | @SunRisers pic.twitter.com/NvGURFEmnz
— IndianPremierLeague (@IPL) May 19, 2024
आयपीएल 2024 च्या प्लेऑफचे वेळापत्रक
21 मे रोजी क्वालिफायर 1 कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद यांच्यात खेळवला जाणार आहे. हा सामना 21 मे रोजी अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियमवर होणार आहे. तर 22 मे रोजी राजस्थान रॉयल्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा एलिमिनेटर सामना होणार आहे. हा सामना सुद्दा नरेंद्र मोदी स्टेडियमवर होणार आहे. त्यानंतर क्वालिफायर 1 मधील पराभूत संघ आणि एलिमिनेटरचा विजेता संघ यांच्यात होईल. हा सामना चेन्नईत होणार आहे. क्वालिफायर 1 चा विजेता आणि क्वालिफायर 2 मधील विजेता यांच्यात 24 मे रोजी अंतिम सामना होणार आहे. अंतिम सामना चेन्नईत होणार आहे.