फोटो सौजन्य - सोशल मीडिया
पॅरिस ऑलिम्पिक २०२४ मेडल टॅली : पॅरिस ऑलिम्पिक २०२४ मधील स्पर्धेत भारताला निराशा हाती लागली होती. पॅरिस ऑलिम्पिक २०२४ मध्ये भारताने ६ मेडलची कमाई केली होती. परंतु आता पॅरिस पॅरालिम्पिकमध्ये पॅरा खेळाडूंनी मेडलची कसर पूर्ण केली आहे. पॅरिस पॅरालिम्पिक २०२४ चा कहर जगभरामध्ये पसरला आहे. यामध्ये अनेक भारताचे खेळाडूंनी कमालीची कामगिरी केली आहे. भारताच्या अनेक खेळाडूंनी अनेक विक्रम मोडले आहेत. भारताच्या दमदार कामगिरीने त्यांनी देशाला मोठ्या स्तरावर नेले आहे. यंदा भारताच्या खेळाडूंनी मागील काही दिवसांमध्ये पॅरिस पॅरालिम्पिक २०२४ मध्ये २५ पदकांची कमाई केली आहे. यामध्ये ५ सुवर्ण, ९ सिल्वर आणि ११ कांस्यपदकाचा समावेश आहे.
भारताने आतापर्यत २५ पदक नावावर केले आहेत. यामध्ये पाच सुवर्ण पदकांचा समावेश आहे. भारत सध्या पॅरिस पॅरालिम्पिक मेडल टॅलीमध्ये २५ पादकांसह १६ व्या स्थानावर आहे. यामध्ये अव्वल स्थानावर चीन आहे, त्यानंतर दुसऱ्या आणि तिसऱ्या स्थानावर अनुक्रमे ग्रेट ब्रिटन आणि युनायटेड स्टेट आहे. चीनचे १६६ पदक आहेत, यामध्ये ७४ गोल्ड मेडल आहेत. भारताला आणखी काही पदक जिंकण्याची सुवर्णसंधी आहे. पॅरिस पॅरालिम्पिक २०२४ च्या नवव्या दिवशी भारताचे खेळाडू ॲक्शनमध्ये असणार आहेत.
2️⃣5️⃣ 𝐀𝐧𝐝 𝐂𝐨𝐮𝐧𝐭𝐢𝐧𝐠….. 𝐇𝐈𝐒𝐓𝐎𝐑𝐘
What a phenomenal effort this has been by our #Paralympians to cross 25 first time in the history of #Paralympics
🇮🇳 Till 2016 | 12 Medals ( In 11 Editions )
🇮🇳 in 2020 | 18 Medals
🇮🇳 in 2024 | 25 Medals*#Paris2024 pic.twitter.com/ZSf3KU9FaY— IndiaSportsHub (@IndiaSportsHub) September 6, 2024