Sanju samson innings in T20 world cup
होय, मी संजू सॅमसनबद्दल बोलत आहे. तो येतो, खेळतो आणि संघाला जिंकवून देतो. तो शांतपणे टीमसोबत उभा राहतो ना कुठले फॅन्सी सेलिब्रेशन, ना चेहऱ्यावर विशेष प्रतिक्रिया. असा हा संजू सॅमसन! २०१५ मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण करूनही आजपर्यंत त्याला फक्त ६० T20 सामने खेळण्याची संधी मिळाली आहे.
फॉर्ममध्ये असताना साऊथ आफ्रिकेसारख्या कठीण खेळपट्टीवर दोन शतके झळकावूनही त्याला संघाबाहेर करण्यात आले. मात्र खचून न जाता, कुठलीही नाराजी व्यक्त न करता तो शांतपणे संघासोबत प्रवास करत राहिला. म्हणूनच संजू सॅमसन खरोखरच खास आहे.संजू हा प्रतिभावान यष्टिरक्षक फलंदाज आहे. त्याने दिल्लीतून क्रिकेटचे धडे घेतले आणि २०११ मध्ये केरळकडून रणजी ट्रॉफी खेळून त्याच्या व्यावसायिक क्रिकेट कारकिर्दीची खरी सुरुवात झाली. २०१३ मध्ये राजस्थान रॉयल्सकडून IPL मध्ये पदार्पण केले. २०१४ मध्ये अंडर-१९ विश्वचषक स्पर्धेत भारताचा उपकर्णधार म्हणून जबाबदारी पार पाडली.
२०१९-२० विजय हजारे ट्रॉफीत त्याने नाबाद २१२ धावांची शानदार खेळी केली होती. असा हा संजू सॅमसन खरंतर संघाचा अविभाज्य खेळाडू असायला हवा होता. जेव्हा जेव्हा त्याला संधी मिळाली, तेव्हा त्याने स्वतःची योग्यता सिद्ध केली.आपण कालची जी मॅच पाहिली, त्यात संजूची मेहनत खऱ्या अर्थाने दिसून आली. वर्ल्ड कपसारख्या मोठ्या स्पर्धेत अशी खेळी संघाला विजय मिळवून देत असेल, तर तिची चर्चा दूरवर होत असते. संयम, फोकस आणि कौशल्य हे सर्व त्याने कालच्या खेळीत दाखवून दिले. १५ वर्षांची मेहनत आता फळाला येताना दिसत आहे.
शांत स्वभाव स्मित हास्य ठेवणारा संजू आर्थिकदृष्ट्या हि साधन आहे. तो ८५ कोटी ते १०० कोटीचा मालक आहे तसेच चेन्नई सुपर किंग्ज कडून खेळताना त्याला १८ कोटींचं मानधन मिळत आहे. BCCI च्या क श्रेणीत असून त्याला वार्षिक ₹१ कोटी रिटेनरशिप मिळते. २०१८ मध्ये त्याने तिरुवनंतपुरममध्ये सिक्स गन्स स्पोर्ट्स अकॅडमी’ सुरू केली, तसेच तो केरळ ब्लास्टर्स एफसी (ISL) आणि २०२५ पासून इंग्लिश प्रीमियर लीग (EPL) चा भारताचा ब्रँड ॲम्बेसेडर आहे.संजू सॅमसंग सामाजिक छेत्रात सुद्धा तेवढाच सहभागी आहे त्याने सॅमसन फाउंडेशन’च्या माध्यमातून केरळमधील गरजू विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी आणि खेळांच्या विकासासाठी मदत करत असतो. धार्मिक वृत्तीचा संजू नियमितपणे चर्चला जातो.केरळमधील पूरग्रस्तांसाठी अनेक वेळा मोठी आर्थिक मदत केली आहे.
आपले आदर्श जर रोहित शर्मा आणि विराट कोहली असतील, तर संजूकडून अशाच खेळीची अपेक्षा आपण नक्कीच करू शकतो.
संजूसाठी कालची खेळी खरोखरच संस्मरणीय होती; पण ती शेवटची नाही, हे त्यालाही माहिती आहे. तो अजून मेहनत घेईल आणि भारतासाठी अशा अनेक शानदार खेळी करून विजय मिळवून देईल. आपण त्याला मनापासून आशीर्वाद देऊया या T20 वर्ल्ड कपमध्ये तो अजून खूप धावा करेल.






