एमएस धोनी आणि अजिंक्य रहाणे(फोटो-सोशल मीडिया)
CSK vs KKR : आयपीएल २०२५ चा २५ वा सामना आज कोलकाता नाईट रायडर्स आणि चेन्नई सुपर किंग्ज या दोन संघात खेळला जाणार आहे. हा सामना ११ एप्रिल रोजी संध्याकाळी ७.३० वाजता चेन्नईतील एम चिदंबरम स्टेडियमवर खेळवण्यात येणार आहे. या सामन्यातून चेन्नई घरच्या मैदानावर विजयी मार्गावर परतण्यासाठी प्रयत्नशील असणार आहे. तर दुसरीकडे, कोलकाता संघ जिंकण्यासाठी उत्सुक असणार आहे. असेल. गेल्या सामन्यात कोलकात्याला ४ धावांनी पराभव पत्करावा लागला होता.
कोलकाता नाईट रायडर्सन संघाने ५ पैकी २ सामने जिंकले आहेत. कोलकाता संघ पॉइंट्स टेबलमध्ये सहाव्या स्थानावर विराजमान आहे. तर चेन्नई सुपर किंग्जने ५ पैकी ४ सामन्यात पराभव स्वीकारावा लागला आहे. एका विजयासह चेन्नई पॉइंट टेबलमध्ये तळाशी म्हणजे 9 व्या स्थानावर आहे. या सामन्यात चेन्नई पॉइंट्स टेबलमध्ये सुधारणा करण्याचा प्रयत्न करणारा आहे.
एम.ए. चिदंबरम हे मैदान फिरकीपटूंना अनुकूल मानले जाते. या मैदानावर जास्त गुण मिळवणे बहुतेक संघांसाठी अवघड मानले जाते. चेन्नईची खेळपट्टी संथ असून ती फिरकी गोलंदाजांसाठी उपयुक्त मानली जाते. जर फलंदाजांनी सुरुवातीलाच वेगवान सुरुवात दिली तर संघ २०० धावांपर्यंत पोहचण्याची शक्यता आहे.
आज चेन्नईमध्ये ढगाळ हवामान राहण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. पावसाची शक्यता सात टक्क्यांनी कमी आहे. दिवसाचे तापमान ३४ अंश सेल्सिअसच्या जवळपास असणार आहे. तर रात्री ते २९ अंश सेल्सिअसपर्यंत घसरेल.
चेन्नई सुपर किंग्ज आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात एकूण ३० सामने खेळण्यात आले आहेत. त्यापैकी CSK ने 19 सामने जिंकले असून कोलकाता संघ 10 च सामने जिंकू शकला आहे. एका सामन्याचा निकाल लागू शकलेला नाही. केकेआरविरुद्धच्या गेल्या सात सामन्यांपैकी पाच सामन्यांमध्ये सीएसकेनेच दबदबा कायम राखत विजय मिळवले आहेत.
हेही वाचा : DC vs RCB : नाद करा! पण, ‘किंग’ कोहलीचा कुठं? रचला नवा विक्रम, असं करणारा ठरला एकमेव फलंदाज..
चेन्नई सुपर किंग्ज संभाव्य खेळी 11 : रचिन रवींद्र, डेव्हॉन कॉनवे, राहुल त्रिपाठी, शिवम दुबे, विजय शंकर, रवींद्र जडेजा, एमएस धोनी (क आणि यष्टिरक्षक), आर अश्विन, नूर अहमद, मथिशा पाथिराना, खलील अहमद.
कोलकाता नाईट रायडर्स संभाव्य खेळत 11 : रहमानउल्ला गुरबाज (यष्टीरक्षक), सुनील नरेन, अजिंक्य रहाणे (कर्णधार), अंगक्रिश रघुवंशी, व्यंकटेश अय्यर, रिंकू सिंग, आंद्रे रसेल, रमणदीप सिंग, मोईन अली/स्पेंसर जॉन्सन, हर्षित राणा, वरुण चक्रवती