राष्ट्रकुल स्पर्धेतून (Commonwealth Games 2022) भारताला कुस्तीपटूंनकडून मिळणाऱ्या सुवर्ण पदकांची रांग लागली आहे. भारताच्या नेव्ही दलात काम करणाऱ्या कुस्तीपटू नवीनने कुमार (Naveen Kumar) राष्ट्रकुल स्पर्धेच्या ९व्या दिवशी पाकिस्तानच्या (Pakistan) मोहम्मद शाहीर ताहीरचा पराभव करत ७४ किलो वजनी गटात सुवर्ण पदक मिळवले आहे. याचबरोबर भारताची कुस्तीतील सुवर्ण पदकांची (Gold medal) संख्या ६ वर पोहोचली असून भारताने राष्ट्रकुल स्पर्धेत कुस्तीत पहिल्यांदाच ६ सुवर्ण पदक पटकावली आहेत.
भारतीय कुस्तीपटू नवीन कुमारने पाकिस्तानच्या ताहीरवर पहिल्या फेरीत पायावर आक्रमण करण्याचा प्रयत्न केला. मात्र ताहिरने आपला बचाव केला. दरम्यान, नवीनने पाकिस्तानच खेळाडू ताहीरवर मजबूत पकड बनवली. त्याने पहिल्या फेरीत 2 गुण पटकावले. त्यानंतर दुसऱ्या फेरीत तांत्रिक दोन गुण पटाकवले आणि त्यानंतर त्याने भारंदाज डाव टाकत ९ गुणांची कमाई केली. नवीन कुमार सामना संपेपर्यंत ९-० अश्या आघाडीवर राहिला. पाकिस्तानच्या मोहम्मद ताहिरला फायनलमध्ये एकही गुण मिळवणे शक्य झाले नाही. नवीनने तांत्रिक सरसतेवर सामना जिंकूलन सुवर्ण पदकाला गवसणी घातली.
भारतीय कुस्तीपटू राष्ट्रकुल स्पर्धेत आपल्या मेहनतीच्या आणि चिकाटीच्या जोरावर पदक मिळवीत असून त्यांनी मिळवलेल्या घवघवीत यशानंतर सर्वस्थरातून त्यांचे कौतुक होत आहे.