मंत्री माणिकराव कोकाटे आणि लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल(फोटो-सोशल मीडिया)
मुंबई : भारताचे लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या १५० व्या जयंतीनिमित्त केंद्र सरकारच्यावतीने ‘सरदार@१५० युनिटी मार्च’ या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या उपक्रमाअंतर्गत राष्ट्रीय पदयात्रेचा शुभारंभ २६ नोव्हेंबर रोजी तर राज्यात या मोहिमेचा शुभारंभ ३१ ऑक्टोबर रोजी होणार आहे. या मोहिमेत राज्यातील जास्तीत-जास्त युवकांनी सहभागी व्हावे असे आवाहन क्रीडा व युवक कल्याण मंत्री माणिकराव कोकाटे यांनी मंत्रालयात आयोजित पत्रकार परिषदेत केले.
या मोहिमेअंतर्गत “विकसित भारत पदयात्रा” उपक्रमाद्वारे युवकांमध्ये देशभक्ती, एकता आणि नागरी जबाबदारी जाणीव, राष्ट्रीय अभिमानाची भावना दृढ करणे, नागरी सहभाग वाढविणे आणि युवकांमध्ये एकतेची व देशभक्तीची भावना रुजविण्यात येणार आहे. राष्ट्रीय स्तराबरोबरच राज्यातही सरदार@150 एकता मार्चचे आयोजन करण्यात येत आहे. लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या 150 व्या जयंतीनिमित्त त्यांच्या राष्ट्रीय एकतेतील योगदानाचे स्मरण ठेवण्यासाठी हा उपक्रम राबविण्यात येत आहे. याद्वारे भारताचा सामाजिक, सांस्कृतिक आणि आर्थिक उत्कर्ष साधणे व एकात्मता वाढवणे यावर भर असणार आहे. या मोहिमेत युवकांना सहभागी करून राष्ट्रनिर्माणात त्यांना सक्रियपणे सहभागी करणे, देशभक्ती आणि नागरी जबाबदारीची भावना जागविणे ही मुख्य प्रेरणा आहे. राज्यात जिल्हा स्तरावर पदयात्रा आयोजित करण्यात येणार आहेत.
हेही वाचा : अभिषेक शर्मा-स्मृती मानधनाची लागली लॉटरी! ICC कडून मिळाला खास सन्मान; वाचा सविस्तर
प्रत्येक जिल्ह्यात तीन दिवसांच्या कालावधीत आठ ते दहा कि.मी. पदयात्रा आयोजित करण्यात येईल. पदयात्रेदरम्यान सरदार पटेल यांच्या प्रतिमेला पुष्पांजली अर्पण करून, आत्मनिर्भर भारताची शपथ घेण्यात येईल. सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे. महाराष्ट्रात सर्व जिल्ह्यामध्ये जिल्हा प्रशासन, क्रीडा विभाग, माय भारत, एनएसएस, एनसीसी तसेच स्थानिक प्रशासन जिल्हास्तरीय पदयात्रा आयोजित करणार आहेत. क्रीडा विभाग या पदयात्रेच्या आयोजनाकरिता आयोजक म्हणून असणार आहे.
सरदार पटेल यांच्या जीवनावर चर्चासत्रे आणि पथनाट्ये (नाटक), नशा मुक्ती भारत प्रतिज्ञा, योग आणि आरोग्य शिबिरे, स्वच्छता मोहिमांचा समावेश, महिला कल्याण शिबिरे, योग आणि आरोग्य शिबिरे, स्वदेशी उत्पादनांना चालना देणारे अभियान “गर्व से स्वदेशी” प्रतिज्ञा, शाळा, महाविद्यालयांमध्ये निबंध, वादविवाद, परिसंवाद, पथनाट्ये, स्थानिक कलांवर आधारित कार्यक्रम-संगीत, नृत्य, लोकनृत्य इत्यादी, संस्था स्वदेशी मेळावे, आत्मनिर्भर भारत प्रतिज्ञा इत्यादी उपक्रम राबविले जाणार आहे.
या उपक्रमासाठी सर्व नोंदणी MY Bharat Portal वर ऑनलाइन पद्धतीने करण्यात येत आहे. https://mybharat.gov.in/pages/unity_march देशातील सर्व युवकांना या ऐतिहासिक आणि प्रेरणादायी “सरदार@150 एकता मोहिमेत” सहभागी होण्याचे आवाहन करण्यात येत आहे. अधिक माहितीसाठी युवक व्यवहार आणि क्रीडा मंत्रालय भारत सरकार यांच्या https://mybharat.gov.in या संकेतस्थळावर भेट द्यावी, असे आवाहन क्रीडा विभागामार्फत करण्यात आले आहे.
जागतिक स्तरावर राष्ट्राची उत्कृष्टता साध्य करण्यासाठी, क्रीडा व आर्थिक आणि सामाजिक विकास तसेच क्रीडा लोकचळवळ वाढविण्याच्या दृष्टीने केंद्र सरकारने खेलो भारत नीति 2025 धोरण तयार केले आहे. या धोरणाच्या धर्तीवर राज्य क्रीडा धोरण तयार करण्यात यावे, यासाठी समिती स्थापन करण्यासाठी प्रस्ताव पाठविण्याचे निर्देश क्रीडा व युवक कल्याण मंत्री ॲड. माणिकराव कोकाटे यांनी दिले. यामध्ये एक खेळ एक संघटनेचा प्राधान्याने समावेश करावा असेही त्यांनी स्पष्ट केले.
हेही वाचा : IND VS AUS : ऑस्ट्रेलियाची आता खैर नाही! ‘रो-को’ने सराव सत्रात मैदानात गाळला घाम;पहा Video
राज्याचे क्रीडा धोरण तयार करण्याच्या प्रक्रियेबाबत आढावा घेण्यासाठी मंत्रालयात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी आमदार संजय बनसोडे, आमदार विजयसिंह पंडीत, आयुक्त शीतल तेली, उपसचिव सुनील पांढरे आणि स्काऊट गाईडचे प्रतिनिधी उपस्थित होते.
क्रीडा मंत्री ॲड.माणिकराव कोकाटे म्हणाले, क्रीडा धोरणात प्राथमिक व माध्यमिक शालेय शिक्षणात क्रीडा उपक्रमांचा समावेश, शालेय व जिल्हास्तरीय क्रीडा प्रतियोगितांना प्रोत्साहन देणे, राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020 च्या धर्तीवर बालपणापासून शारीरिक शिक्षणाची गोडी निर्माण व्हावी यासाठी उपक्रम राबविणे, क्रीडा स्पर्धा आयोजित करणे, क्रीडा प्रोत्साहन संस्थांची निर्मिती करणे आदि विषयांचा समावेश करावा. तसेच, आमदार खेळाडू, नैपुण्य प्राप्त खेळाडू, प्रशिक्षक, संघटनांचे प्रतिनिधी, शासकीय अधिकारी, पत्रकार, क्रीडा तज्ज्ञ यांचा क्रीडा धोरण समितीमध्ये समावेश करावा. तसेच, खेळाडूंचे याबाबत ऑनलाईन पद्धतीने मागविण्यात याव्यात, अशी सूचनाही मंत्री ॲड. कोकाटे यांनी केली.