बिहार निवडणुकीसाठी फडणवीस स्टार प्रचारक (फोटो- सोशल मीडिया)
भाजपने जाहीर केली स्तर प्रचारकांची यादी
महाराष्ट्रातील 3 नेत्यांचा समावेश
बिहार विधानसभा निवडणूक जिंकण्यासाठी भाजपची जोरदार रणनीती
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे दिल्ली दरबारी वजन वाढल्याचे दिसून येत आहे. केंद्रातील भाजप नेतृत्वाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर मोठी जबाबदारी सोपवली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे भाजपमध्ये एक महत्वाचे नेते आहेत. ते सध्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत. बिहार निवडणूक जिकण्यासाठी आता त्यांच्यावर मोठी जबाबदारी देण्यात आली आहे.
भाजपने बिहार विधानसभा निवडणूक जिंकण्यासाठी स्टार प्रचारकांची यादी जाहीर केली आहे. स्टार प्रचारकांच्या यादीत 40 जणांचा समावेश करण्यात आला आहे. यामध्ये महाराष्ट्रातील तीन नेत्यांचा समावेश आहे. यामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, विनोद तावडे आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचा समावेश असणार आहे.
BJP releases a list of star campaigners for phase 1 of #BiharElections The list includes the names of PM Narendra Modi, Union Ministers JP Nadda, Amit Shah, Rajnath Singh, Nitin Gadkari, Shivraj Singh Chouhan, Assam CM Himanta Biswa Sarma, UP CM Yogi Adityanath, among other… pic.twitter.com/Miwd5VUUpq — ANI (@ANI) October 16, 2025
बिहार विधानसभा निवडणूक जिंकण्यासाठी भाजप आणि एनडीएने जोरदार तयारी सुरू केली आहे. बिहारमध्ये पुन्हा एकदा सत्ता स्थापन करण्यासाठी भाजपने रणनीती तयार केली आहे. उमेदवारांची घोषणा केली आहे. तसेच उमेदवारांचा प्रचार करण्यासाठी स्टार प्रचारकांची यादी देखील जाहीर केली आहे. स्टार प्रचारकांच्या यादीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा देखील समावेश आहे.
RSS ठरवणार बिहारचा मुख्यमंत्री; ‘एनडीए’ जिंकल्यास नितीश कुमारांचा पत्ता कट?
बिहारमध्ये एनडीएची सत्ता आल्यास कोण मुख्यमंत्री होणार याकडे देखील सर्वांचे लक्ष लागले आहे. भाजप पुन्हा एकदा नितीश कुमार यांच्या गळ्यात मुख्यमंत्रीपदाची माळ घालणार का हे पहावे लागणार आहे. कारण भाजपच्या जास्त जागा निवडून आल्या असल्या तरी नितीश कुमार हे मुख्यमंत्री झाले होते.
महाराष्ट्र, हरियाणा आणि दिल्ली यांच्या विधानसभा निवडणुका भाजपने जिंकल्या आहेत. दरम्यान या तीनही राज्यांमध्ये मुख्यमंत्री कोण होणार हे ठरवताना राष्ट्रीय स्वयंमसेवक संघाची भूमिका महत्वाची ठरली आहे. महाराष्ट्रात महायुती जिंकल्यावर देवेंद्र फडणवीस यांच्या नावाला मुख्यमंत्री म्हणून संघाने देखील मान्यता दिल्याचे समोर आले होते. दरम्यान यंदा एनडीए जिंकल्यास नितीश कुमार यांचा मुख्यमंत्रीपदाचा पत्ता कट होण्याची शक्यता आहे.
ऑपरेशन त्रिशूळ
बिहार विधानसभा निवडणुकीत एनडीएला विजयी करण्यासाठी संघ मैदानात उतरला आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ भाजपची मातृसंस्था समजली जाते. बिहारमध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ‘ऑपरेशन त्रिशूळ’च्या माध्यमातून लोकांपर्यंत जाणार आहे. संघाचे स्वयंसेवक तळागाळामध्ये जाऊन काम करणार आहेत. ज्या-ज्या वेळेस संघ मैदानात उतरला आहे, तेव्हा भाजपला मोठा विजय मिळाल्याचे पाहायला मिळाले आहे.