फोटो सौजन्य: iStock
भारतीय ऑटो बाजार बाईक्सच्या विक्रीत मोठी वाढ होत आहे. शहरी भागात तर बाईकचा वापर होतोच. मात्र, यासोबतच ग्रामीण भागातही बाईकचा वापर मोठ्या प्रमाणात होत असतो. त्यामुळेच अनेक दुचाकी उत्पादक कंपन्या शहरी भागांसह ग्रामीण भागातही उत्तम बाईक पोहोचाव्यात याबद्दल प्रयत्न करत असतात. खरंतर, ग्रामीण भारतात, बाईक ही फक्त एक राईड नाही तर ती दैनंदिन गरज आहे. खडबडीत रस्ते, शेती आणि गावातील खडबडीत भूभागातून प्रवास करण्यासाठी मजबूत, इंधन-कार्यक्षम आणि कमी देखभालीची बाईक आवश्यक असते. जर तुम्ही तुमच्या बजेट फ्रेंडली बाईकच्या शोधात असाल. तर आज आपण ग्रामीण भागासाठी बेस्ट पाच बाईकबद्दल जाणून घेऊयात.
हिरो स्प्लेंडर प्लस ही भारतातील सर्वाधिक विक्री होणारी बाईक आहे. याची किंमत 73,902 रुपये (एक्स-शोरूम) किंमत असलेली ही बाईक तिच्या 97.2 सीसी इंजिनसह 73 किमी प्रति लिटर पर्यंत प्रभावी इंधन बचत देते. यात i3S स्टॉप-स्टार्ट तंत्रज्ञान आहे, जे इंधन वाचविण्यास मदत करते, तर एलईडी हेडलॅम्प, ब्लूटूथ-सक्षम डिजिटल कन्सोल आणि लांब सीट सारख्या फीचर्समुळे ती आणखी व्यावहारिक बनते.
Toyota Urban Cruiser चा ‘हा’ खास एडिशन झाला लाँच, नॉर्मल एडिशन पेक्षा किती जास्त असेल किंमत?
बजाज प्लॅटिना 100 ही याच्या उत्कृष्ट इंधन कार्यक्षमतेसाठी आणि आरामदायी राईडसाठी ओळखली जाते. 65,407 हजार रुपये किंमत असलेली ही बाईक 102 सीसी डीटीएस-आय इंजिन देते ज्याची इंधन कार्यक्षमता ताशी 80 किमी पर्यंत आहे. याचे सस्पेंशन आणि लांब सीट खडबडीत भूभागावरही सहज रायडिंगचा अनुभव देते. 10-लिटर इंधन टाकीसह, ही बाईक एका फुल टँकवर सुमारे 800 किलोमीटरची रेंज मिळू शकते.
होंडा शाइन 100 ही अशा लोकांसाठी आहे ज्यांना आरामदायी आणि उत्तम परफॉर्मन्स हवा आहे. या बाईकची किंमत 68,994 रुपये (एक्स-शोरूम) आहे. ही बाईक 98.98 सीसी इंजिनने सुसज्ज आहे जी 65 किमी/ताशी पर्यंत इंधन कार्यक्षमतेची राईड देते. यात 7.5 पीएस पॉवर आणि आयबीएस ब्रेकिंग सिस्टम आहे, जी सुरक्षितता सुधारते.
TVS Sport ही स्पोर्टी लूक आणि हाय मायलेजमुळे लहान शहरांमध्ये व ग्रामीण भागात झपाट्याने लोकप्रिय होत आहे. या बाईकची किंमत ₹55,100 (एक्स-शोरूम) आहे. यात 109.7cc इंजिन दिले असून ही बाईक प्रति लिटर 70 किमीपर्यंत मायलेज देते. TVS च्या मते, ही बाईक एकदा फुल टँक भरल्यावर 700 किलोमीटरहून अधिक अंतर कापू शकते.
TVS Radeon ही सुद्धा ₹55,100 पासून सुरू होणाऱ्या किमतीत उपलब्ध आहे आणि ती 69 kmpl पर्यंत मायलेज देते. यात 109.7cc एअर-कूल्ड इंजिन दिले असून ते परफॉर्मन्स आणि मायलेज यांचा उत्तम समतोल राखते. याचे डिझाईन आकर्षक असून यात ड्युअल-टोन सीट, डिजिटल-अनालॉग मीटर आणि LED DRLs सारखे आधुनिक फीचर्स दिले आहेत.