पनवेल ग्रामीण आणि कळंबोली परिसरात सुरू असलेल्या पाणीटंचाईविरोधात भारतीय जनता पक्षाने आज तीव्र आंदोलन केलं. गेल्या काही दिवसांपासून नागरिकांना अपुऱ्या पाणीपुरवठ्याचा मोठा त्रास सहन करावा लागत आहे. सेक्टर 3, सेक्टर 10 आणि नावडे परिसरातील नागरिकांनी यापूर्वी सिडको कार्यालयावर मोर्चा काढून निषेध नोंदवला होता. मात्र परिस्थितीत सुधारणा न झाल्याने यावेळी सत्ताधारी भाजपनेच आंदोलनाचा मार्ग स्वीकारला. आंदोलनादरम्यान कार्यकर्त्यांनी प्रशासनाला दोन दिवसांची मुदत दिली असून, पाणीपुरवठा सुरळीत न झाल्यास अधिकाऱ्यांना साडी-बांगडी भेट देऊन अनोख्या पद्धतीने निषेध करण्याचा इशारा दिला. या आंदोलनामुळे स्थानिक राजकारणात नव्या चर्चेला उधाण आलं आहे.