धुळे तालुक्यातील वडजाई–सौंदाणे–बाबुळवाडी रस्ता अत्यंत दुरावस्थेत आहे, आणि या रस्त्याची चाळण झाल्याने नागरिकांना रोजच्या जीवनात मोठा त्रास सहन करावा लागत आहे. या रस्त्याच्या कामासाठी ग्रामपंचायत सदस्यांपासून ते खासदारांपर्यंत सर्वांना अनेकदा माहिती दिली गेली, तरीही काम सुरू झालेले नाही. निविदा निघून एक वर्ष उलटले असूनही कामाला सुरुवात झालेली नाही.यामुळे गावकऱ्यांनी अनोख्या पद्धतीने ‘विशेष आभार आंदोलन’ राबवले. या आंदोलनामध्ये नागरिकांनी लोकप्रतिनिधींना जाग आणण्यासाठी आणि रस्त्याचे काम त्वरित सुरू होण्यासाठी आपली मागणी व्यक्त केली. गावकऱ्यांनी सांगितले की, या आंदोलनामुळे लोकप्रतिनिधींना दुरुस्तीसाठी बळ मिळेल आणि वडजाई–सौंदाणे–बाबुळवाडी रस्त्याचे काम लवकरात लवकर सुरू होईल, हा उद्देश आहे.