कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघ अर्थात गोकुळ दूध संघाने केलेल्या डिबेंचर रक्कम कपातीवरून जिल्ह्यातील संस्थाचालक आक्रमक झालेतं. विरोधी संचालिका शौमिका महाडिक यांच्या नेतृत्वाखाली आज दूध उत्पादक शेतकरी आणि संस्थाचालकांनी गोकूळवर धडक मोर्चा काढला..दूध उत्पादक शेतकऱ्यांनी शासकीय विश्रामगृहपासून गायीम्हैशींसह जवाब दो मोर्चा काढून गोकूळ संघाच्या कार्यालयावर धडक दिली..मोर्चा गोकूळच्या कार्यालयावर धडकताच आंदोलकांना गेटवर अडवल्याने आंदोलक आणि पोलिसांमध्ये मोठी झटापट झाली..त्यामुळे या परिसरात काही काळ तणावचं वातावरण निर्माण झालं होतं..त्यानंतर जनावरांसह आंदोलकांनी कार्यालयाच्या दारात जावून गोकूळ प्रशासना विरोधात जोरदार घोषणाबाजी केली.गोकुळ दूध संघाने दूध संस्थाकडून 40 टक्के डिबेंचर रक्कम कपात केली आहे.