
Tech Tips: Airplane मोड की DND? कोण वाचवतं स्मार्टफोनची सर्वाधिक बॅटरी? जाणून घ्या सविस्तर
YouTube वर आता चालणार तुमची मर्जी! अल्गोरिदम नाही यूजर्स सेट करू शकणार त्यांची आवड; कसं? जाणून घ्या
एयरप्लेन मोड आणि डीएनडी या दोन्हीचे अनेक फायदे आहेत. पण याचा सर्वाधिक वापर बॅटरी लाईफ वाढवण्यासाठी केला जातो. अनेकदा युजर्स यांच्या स्मार्टफोनची बॅटरी लाइफ वाढावी यासाठी स्मार्टफोनमध्ये एयरप्लेन मोड किंवा डीएनडी मोड ऑन करतात. डू नॉट डिस्टर्ब मोडचा वापर केल्यास बॅटरी लाईफ थोडी वाढते. मात्र जेव्हा एयरप्लेन मोडचा वापर केला तर बॅटरी बॅकअप मोठ्या प्रमाणात वाढत असल्याचे पाहायला मिळते. (फोटो सौजन्य – Pinterest)
एयरप्लेन मोड फोनची बॅटरी लाईफ जास्त सेव्ह करते. जेव्हा एअरप्लेन मोड ऑन केला जातो, फोनमधील सर्व रेडियो कनेक्टिविटी बंद केले जातात. हा मोड सेल्यूलर मॉडेम, वाय-फाय आणि ब्लूटूथ कनेक्टिविटी बंद करण्यास सक्षम आहे. यामुळेच फोनची बॅटरी लाईफ सेव्ह करण्यासाठी मदत होते. स्मार्टफोनमध्ये रेडिओ कम्युनिकेशनसाठी बॅटरीचा सर्वाधिक वापर केला जातो. जेव्हा स्मार्टफोनमध्ये रेडिओ कम्युनिकेशन बंद केले जाते तेव्हा बॅटरीची बचत होते.
जर तुम्ही अशा परिस्थितीमध्ये राहत असाल जिथे नेटवर्कची समस्या आहे, तर तुमच्या फोनमधील बॅटरी वेगाने संपू शकते. फोनचे मॉडेम कनेक्टिविटीसाठी सतत नेटवर्क शोधत असतो. यामुळे बॅटरी लवकर संपते. पण जेव्हा डीएनडी मोडचा विचार केला जातो, तर या मोडमध्ये फोन मधील कनेक्टिव्हिटी बंद केली जात नाही. तर ऑडियो आणि हॅप्टिक मोटर (वाइब्रेशन) बंद केले जाते.
डीएनडी मोडचा वापर करताना जेव्हा फोनमध्ये नोटिफिकेशन येते तेव्हा कोणत्याही प्रकारचा आवाज येत नाही आणि फोन व्हायब्रेशन देखील करत नाही. त्यामुळे युजर्सना आराम करताना किंवा मीटिंगमध्ये डिस्टर्ब होत नाही. यामुळे बॅटरी थोडी कमी खर्च होते. जर तुम्ही फोनची बॅटरी वाचवण्यासाठी एयरप्लेन मोड की डू नॉट डिस्टर्ब मोड या दोन्हींमध्ये गोंधळला असाल तर नक्कीच एयरप्लेन मोड अधिक फायदेशीर ठरणार आहे. कारण यामध्ये बॅटरीची सर्वाधिक बचत केली जाते.