OnePlus सेल लवकरच होणार सुरु! स्मार्टफोनपासून टॅब्लेटपर्यंत... ऑफर्स आणि डिस्काऊंटसह करा मनसोक्त शॉपिंग
वनप्लस कम्युनिटी सेलमध्ये ग्राहकांना कंपनीच्या फ्लॅगशिप वनप्लस 15 आणि वनप्लस 15R सह वनप्लस 13 लाइनअप, लेटेस्ट नॉर्ड स्मार्टफोन, टॅब्लेट आणि ऑडियो प्रोडक्ट्सवर देखील आकर्षक डिल्स मिळणार आहेत. वनप्लस कम्युनिटी सेल 2026 वनप्लस इंडिया, ॲमेझॉन, फ्लिपकार्ट आणि ऑफलाइन रिटेल चॅनेल्सवर लाईव्ह होणार आहे. त्यामुळे जर तुम्ही गेल्या बऱ्याच काळापासून वनप्लस, स्मार्टफोन, टॅब्लेट किंवा इतर कोणतेही प्रोडक्ट खरेदी करण्याचा विचार करत असाल तर ही तुमच्यासाठी एक चांगली संधी ठरणार आहे. या सेलमध्ये ग्राहकांना कोणत्या ऑफर्स मिळणार आहेत, याबाबत आता जाणून घेऊया. (फोटो सौजन्य – OnePlus)
वनप्लस 15 वर उपलब्ध असलेल्या ऑफरबद्दल बोलायचं झालं तर कंपनी या स्मार्टफोनच्या खरेदीवर ग्राहकांना 3 हजार रुपयांचे डिस्काऊंट ऑफर करणार आहे. त्यामुळे 77,999 रुपयांच्या किंमतीत लाँच करण्यात आलेला वनप्लस 15 सेलमध्ये केवळ 74999 रुपयांना खरेदी करण्याची संधी मिळणार आहे. तसेच वनप्लस 15 आर च्या खरेदीवर देखील ग्राहकांना बँक ऑफर्सचा फायदा घेण्याची संधी मिळणार आहे. या ऑफर्स आणि डिस्काऊंटनंतर स्मार्टफोनची किंमत केवळ 51,999 रुपये असणार आहे.
वनप्लस 13 स्मार्टफोन वनप्लस कॉम्युनिटी सेल दरम्यान 52,999 रुपयांच्या सुरुवातीच्या किंमतीत खरेदीसाठी उपलब्ध आहे. वनप्लस 13 एस स्मार्टफोन या सेलमध्ये 49,999 रुपयांच्या किंमतीत लिस्ट करण्यात आला आहे. तसेच, वनप्लस कम्युनिटी सेल 2026 दरम्यान नॉर्ड ब्रँडचे स्मार्टफोन्स देखील ग्राहकांना अत्यंत कमी किंमतीत खरेदी करण्याची संधी मिळणार आहे. लेटेस्ट वनप्लस नॉर्ड 6 स्मार्टफोन सेलमध्ये 40,999 रुपयांच्या सुरुवातीच्या किंमतीत खरेदीसाठी उपलब्ध असणार आहे. तर वनप्लस नॉर्ड सीई 6 स्मार्टफोन 29,999 रुपये आणि नॉर्ड सीई 6 लाईट स्मार्टफोन 21,499 रुपयांच्या किंमतीत खरेदीसाठी उपलब्ध असणार आहे.
स्मार्टफोन्सव्यतिरिक्त वनप्लस पॅड 4 च्या खरेदीवर 3 हजार रुपयांचे बँक डिस्काऊंट मिळणार आहे. त्यामुळे या डिव्हाईसची किंमत 56,999 रुपये होणार आहे. वनप्लस पॅड गो 2 खरेदीसाठी 26,999 रुपयांपासून उपलब्ध आहे, तर पॅड लाइट 16,999 रुपयांना उपलब्ध आहे. हा वनप्लस सेल 6 जून ते 10 जून पर्यंत चालेल.






