पुण्यातील 'त्या' गावांच्या विकासासाठी महापालिका थेट जागतिक बँकेकडून कर्ज घेणार
महापालिकेने याविषयीचा सगळा कर्ज आराखडा जागतिक बँकेच्या पुण्यात आलेल्या शिष्टमंडळासमोर मांडला. त्याला शिष्टमंडळाने सकारात्मक प्रतिसाद दिला असून, बँकिंग प्रक्रियेद्वारे ७.३% च्या स्पर्धात्मक व्याजदराने दर निश्चिती पूर्ण झाल्याची माहिती, महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांनी पत्रकारांशी बोलताना दिली. रिजनल प्रॅक्टिस डायरेक्टर मारा वॉरविक यांच्या नेतृत्वाखाली आलेल्या शिष्टमंडळात इंटरनॅशनल बँक फॉर रिकन्स्ट्रक्शन अँड डेव्हलपमेंटआणि इंटरनॅशनल फायनान्स कॉर्पोरेशन चे प्रतिनिधी होते.
यामध्ये विल्यम रेक्स, नुरू लामा, हर्ष गोयल, नीरज गुप्ता, अतिरिक्त आयुक्त पवनीत कौर आणि ओमप्रकाश दिवटे, शहर अभियंता अनिरुद्ध पावसकर, उल्का कळसकर, नंदकिशोर जगताप, दिनकर गोजारे, राजेश बनकर हे विभाग प्रमुख उपस्थित होते.
या शिष्टमंडळापुढे अतिरिक्त आयुक्त पवनीत कौर यांनी अर्बन चॅलेंज फंड अंतर्गत प्रमुख प्रस्ताव सादर केले, ज्यात १२ नव्याने विलीन झालेल्या गावांसाठीच्या ८९० कोटी रुपयांच्या पाणीपुरवठा प्रकल्पाचा समावेश आहे. या प्रकल्पाचा सुरुवातीला अंदाजे चार लाख लोकांना आणि २०५२ पर्यंत ७.७८ लाख लोकांना फायदा होण्याची अपेक्षा आहे, असे शिष्टमंडळाला सांगितल्याचे राम म्हणाले.
एडीएमसीने ३०४ निश्चित केलेल्या ठिकाणी ४०० कोटी रुपयांच्या पूर निवारण प्रकल्पाची रूपरेषाही सादर केली. नव्याने विलीन झालेल्या गावांसाठीच्या सांडपाणी प्रस्तावांवरही चर्चा झाली, ज्यामध्ये सात सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प (एसटीपी) आणि अंदाजे ३५७ किमी लांबीच्या सांडपाणी वाहिनीच्या जाळ्याचा समावेश आहे.
महापालिका कर्ज घेत असली तरी…
महापालिका कर्ज घेत असली तरी या गावांच्या विकासासाठी केंद्र, राज्य सरकारही मदत करणार आहे. उर्वरीत खर्च महापालिकेला करावा लागणार आहे. त्यासाठी महापालिकेला कर्ज घ्यावे लागणार आहे. महापालिकेला ७.३ टक्के व्याजदराने कर्ज मिळू शकेल, जे अत्यंत कमी आहे. आम्ही यामध्ये आणखी वाटाघाटी करणार असून, हा व्याजदर कसा कमी होईल यासाठी प्रयत्न करणार आहे.
– नवलकिशोर राम, आयुक्त, पुणे महापालिका
==============================
FAQ
कोणती गावे आहेत समाविष्ट?
– पुणे महापालिका हद्द 1987 ला 125 sq km होती. आता 2021 नंतर 508 sq km झाली आहे. यात 2 टप्प्यात गावे आली. 2021 ला समाविष्ट 23 गावे – यांचाच DP आता PMC करत आहे. म्हाळुंगे, सूस, बावधन बु., किरकटवाडी, पिसोळी, कोंढवे-धावडे, कोपरे यासह इतर गावांचा समावेश आहे.
जागतिक बँकेकडून कर्ज म्हणजे नेमके काय? किती रक्कम?
– वेगवेगळ्या चर्चा सुरू आहेत. त्यात World Bank Group – Direct Support – 23 ऑक्टोबर 2026 ची बैठक झाली. PMC मुख्यालयात बैठक – World Bank च्या Mara Warwick, Regional Practice Director for Water यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळ आले.
सध्या पाण्याची स्थिती काय?
– खडकवासला, नांदेड, नांदोशी, सणसनगर, किरकटवाडी, धायरी, नऱ्हे , जांभूळवाडी, कोळेवाडी, मांगडेवाडी, निंबाळकरवाडी, भिलारेवाडीयेथे सध्या फक्त क्लोरीन टाकलेले कच्चे पाणी मिळते.






