फोटो सौजन्य - pinterest
सर्वचजण अगदी आतुरतेने वाट पाहत असेलेले Amazon Prime Day Sale 2024 अखेर सुरु झाला आहे. आज मध्यरात्री 12 वाजता हा सेल सुरु झाला असून 21 जुलै रोजी रात्री 11.59 वाजेपर्यंत हा सेल सुरु राहणार आहे. दोन दिवस चालणाऱ्या या सेलमध्ये ग्राहकांना स्मार्टफोन, स्मार्ट टिव्ही, लॅपटॉप, होम अप्लायंस, या सर्वांवर बंपर डिस्काऊंट मिळणार आहे.
Amazon Prime Day Sale 2024 बद्दल ग्राहक गेल्या अनेक दिवसांपासून उत्सुक होते. आता अखेर या सेलला सुरुवात झाली आहे. Amazon Prime Day Sale मध्ये कंपनी अनेक डील आणि वस्तूंवर बंपर डिस्काऊंट देणार आहे. गॅजेट्स आणि घरगुती वस्तूंपासून फॅशनपर्यंतच्या सर्व गोष्टी Amazon प्राइम सदस्यांना स्वस्त किंमतीत मिळणार आहेत. तुम्ही सुध्दा जर Amazon प्राइम सदस्य असाल, तर तुम्हालाही बंपर ऑफर्ससह मनसोक्त शॉपिंग करता येणार आहे.
हेदेखील वाचा- मायक्रोसॉफ्ट विंडोज सर्व्हर डाऊन प्रकरणी सीईओ सत्या नडेला यांचं मोठं वक्तव्य; X वर शेअर केली पोस्ट
Haier 4K Ultra HD Smart LED Google TV
Haier 4K Ultra HD Smart LED Google TV मध्ये डॉल्बी ऑडिओ सपोर्टसह 24W स्पीकर आहेत. यामध्ये गुगल असिस्टंट सपोर्ट आहे. 4K अल्ट्रा डिस्प्ले व्यतिरिक्त, यात HDR10 सह 60Hz रिफ्रेश दर देखील असेल. Amazon Prime Day Sale मध्ये Haier 4K Ultra HD Smart LED Google TV वर डिस्काऊंट देण्यात आला असून सेलमध्ये या टिव्हीची किंमत केवळ 36,730 रुपये आहे.
VU The GloLED Series Smart LED Google TV
या स्मार्ट टीव्हीमध्ये 60Hz रिफ्रेश रेटसह 400nits ची सर्वोच्च ब्राइटनेस देखील आहे. याशिवाय हे AI GLO प्रोसेसरवर काम करते. यात 4 स्पीकर आहेत. हे Google TV OS ला देखील सपोर्ट करते. Amazon Prime Day Sale मध्ये याची किंमत 32,999 रुपये आहे. यामध्ये तुम्हाला अनेक बँक ऑफर्स मिळतील.
TOSHIBA C35ONP Series 4K Ultra HD Smart LED Google TV
जपानी ब्रँडच्या या स्मार्ट टीव्हीला डॉल्बी व्हिजन ॲटमॉस सपोर्ट आहे. यामध्ये यूजरला फ्रेमलेस डिझाइनसह पॉवरफुल स्पीकर देखील मिळतात. TOSHIBA चा हा स्मार्ट टीव्ही Google TV OS वर काम करतो. त्याची किंमत 32,000 रुपयांपासून सुरू होते. या टिव्हीच्या खेरदीवर सेलमध्ये तुम्हाला अनेक डिस्काऊंटसह अनेक बँक ऑफर्स देखील मिळतील.
लॅपटॉपवर देखील भरगोस डिस्काऊंट
Amazon च्या प्राइम डे सेलमध्ये तुम्हाला लॅपटॉपवर देखील भरगोस डिस्काऊंट मिळेल. ॲमेझॉनच्या या सेलमध्ये तुम्ही डेल, एचपी, लेनोवोसह इतर कंपन्यांचे लॅपटॉप खरेदी करू शकता. Amazon प्राइम डे सेलमध्ये लॅपटॉप खरेदी करताना तुम्हाला 24 महिन्यांच्या EMI चा पर्याय देखील मिळेल.
हेदेखील वाचा- Amazon सेलमधून खरेदी करताय? डिस्काऊंट आणि बंपर ऑफर्स शोधण्यासाठी ‘या’ ट्रीक्सचा वापर करा
सॅमसंग डी सीरीजवर डिस्काऊंट
सॅमसंगच्या या स्मार्ट टीव्हीवर Amazon प्राइम डे सेलमध्ये 27,000 रुपयांची सूट मिळेल. तुम्हाला इतर सॅमसंग टीव्हीवरही उत्तम ऑफर मिळतील. याशिवाय, तुम्हाला LG, Toshiba, Sony सह इतर कंपन्यांच्या स्मार्ट टीव्हीवर चांगली विशेष सूट मिळेल.
गृहोपयोगी वस्तूंवर ५५ टक्के सूट
Amazon प्राइम डे सेलमध्ये, घरगुती उपकरणांवर 55 टक्के सूट दिली जात आहे. या सेलमध्ये तुम्ही रेफ्रिजरेटर, वॉशिंग मशीन, मिक्सर ग्राइंडर आणि इतर उत्पादने खरेदी करू शकता.
स्मार्टफोनवर देखील स्मार्ट ऑफर्स
ॲमेझॉन प्राइम डे सेलमध्ये स्मार्टफोनवर देखील विशेष सूट देण्यात आली आहे . या सेलमध्ये तुम्ही चांगल्या डिस्काऊंट आणि ऑफर्ससह प्रीमियम फोन खरेदी करू शकता.