Apple ने iOS यूजर्ससाठी काही नवीन ऍक्सेसिबिलिटी फीचर्स (Accessibility Features) आणले आहेत. हे फिचर विशेषतः अशा लोकांसाठी असणार आहे, ज्यांना चालू गाडीमध्ये त्यांचा फोन किंवा टॅब्लेट वापरताना मोशन सिकनेसचा त्रास होतो. कंपनीच्या म्हणण्यानुसार, ही समस्या सामान्यतः तेव्हा उद्भवते जेव्हा तुमचे डोळे काय पाहत आहेत आणि तुमच्या शरीराला काय वाटत आहे यात फरक असतो. या समस्येवर मात करण्यासाठी, Apple iPhones आणि iPads साठी “Vehicle Motion Cues” हे नवीन वैशिष्ट्य सादर करत आहे. हे चालत्या गाडीमध्ये बसलेल्या लोकांचे हालचाल कमी करण्यास मदत करू शकते.
हे नवीन फिचर कसे काम करेल
Apple ने म्हटले आहे की Vehicle Motion Cues फीचरमध्ये, वाहनाचा वेग बदलला की स्क्रीनच्या बाजूला लहान ठिपके हलतील. यामुळे तुमचे डोळे काय पाहत आहेत आणि तुमच्या शरीराला काय वाटत आहे याचा जास्त मेळ बसेल आणि लोक कमी घाबरतील. कंपनीने असेही म्हटले आहे की हे फिचरऑटोमॅटिक चालू केले जाऊ शकते किंवा ते कंट्रोल सेंटरवरून सहज ऑन किंवा ऑफ केले जाऊ शकते.
[read_also content=”Google Chrome चा नवीन व्हर्जन रिलिज, काय खास आहे यात, जाणून घ्या सविस्तर https://www.navarashtra.com/technology/google-launched-new-version-of-a-chome-read-in-detail-535965.html”]
व्हेईकल मोशन क्यूज फीचर
व्हेईकल मोशन क्यूज (vehicle motion cues) फीचर व्यतिरिक्त, Apple ने अनेक ॲक्सेसिबिलिटी फीचर्स देखील आणले आहेत. यापैकी एक म्हणजे आय ट्रॅकिंग फीचर (Eye tracking feature). नावाप्रमाणेच या फीचरनुसार, शारीरिकदृष्ट्या अक्षम यूजर्स iPhone किंवा iPad च्या स्क्रीनवर फक्त त्यांच्या डोळ्यांच्या मदतीने स्वाइप करणे, नेव्हिगेट करणे, स्क्रोलकरणे आणि बटणे दाबणे, यासारख्या फंक्शन्सचा सहज वापर करू शकतात.
कारप्ले व्हॉइस शॉर्टकट फीचर
एवढेच नव्हे तर आता, कारप्ले व्हॉइस शॉर्टकट (CarPlay Voice Shortcuts) फीचरच्या मदतीने यूजर्सना हात न वापरताही त्यांचे काम करता येईल. याशिवाय यात तुमच्या आवडीचे आणि अवघड शब्द ओळखण्याची सुविधा, कलर फिल्टर्स आणि व्हॉइस रेकग्निशन फीचर्सचाही समावेश आहे. या फीचर्सच्या मदतीने कारमध्ये बसलेल्या लोकांना कमी ऐकू येत असल्यास त्यांना हॉर्न आणि सायरनचे आवाज ऐकू येऊ शकतात.






