Apple चं भारतीयांसाठी खास गिफ्ट, 'या' शहरात कंपनी सुरु करणार चार नवीन स्टोअर
Apple पुढच्या वर्षी भारतात आणखी चार नवीन स्टोअर सुरू करण्याचा विचार करत आहे. देशात आधीच दोन Apple स्टोअर्स आहेत. अशातच आता कंपनी अजून 4 स्टोअर्स सुरू करण्याचा विचार करत आहे. पुणे, बेंगळुरू, दिल्ली-एनसीआर आणि मुंबई या शहरात नवीन स्टोअर्स उघडण्याची कंपनीची योजना आहे. नवीन स्टोअर्स सुरू झाल्यामुळे ग्राहकांना अधिक खरेदीचे पर्याय उपलब्ध होतील, त्यामुळे भारतातील Apple ग्राहकांमध्ये वाढ होईल अशी आशा आहे. याशिवाय Apple या महिन्यात भारतात बनवलेल्या आयफोनची विक्री लवकरच सुरू करणार आहे.
हेदेखील वाचा- 5000 mAh बॅटरी आणि 256GB स्टोरेजसह Moto G75 5G लाँच, या दिवशी होणार पहिली सेल
Apple ने एप्रिल 2023 मध्ये भारतात त्यांचे दोन स्टोअर सुरु केले, पहिले दिल्लीत आणि दुसरे मुंबईत. त्यांनतर आता ॲपल भारतात आपले स्टोअर वाढवण्याचा विचार करत आहे. कंपनी येत्या काही दिवसांत पुणे, बेंगळुरू, दिल्ली-एनसीआर आणि मुंबई येथे चार नवीन स्टोअर सुरु करणार आहे. कंपनीने सांगितलं की, या महिन्यात ते मेड इन इंडिया iPhone 16 Pro आणि iPhone 16 Pro Max ची विक्री सुरू करणार आहे. त्यामुळे ग्राहक प्रचंड उत्सुक आहेत. (फोटो सौजन्य – pinterest)
भारतात Apple ची नवीन स्टोअर्स सुरू होण्याबाबत Apple ने सांगितले की, आम्ही भारतात नवीन स्टोअर सुरू करण्याचा विचार करत आहोत. देशभरातील आयफोनच्या क्रेझपासून प्रेरित होऊन आम्ही ही योजना बनवत आहोत. कंपनीने निवेदनात म्हटले आहे की, भारतात बनवलेले iPhone 16 Pro आणि Pro Max लवकरच ग्राहकांसाठी उपलब्ध होतील.
Apple रिटेलचे वरिष्ठ उपाध्यक्ष डियर्डे ओब्रायन यांनी एका निवेदनात सांगितले की, आम्हाला कंपनीची सेवा सुधारायची आहे आणि ग्राहकांच्या प्रश्नांचे त्वरीत निराकरण करायचे आहे. पुढील वर्षी ही दुकाने सुरू होण्याची शक्यता आहे. कंपनीने असेही जाहीर केले की ती आता भारतात आयफोन 16 सिरिजमधील स्मार्टफोन तयार करेल.
हेदेखील वाचा- गुगलने लाँच केले AI पॉवर्ड समरी कार्ड, Gmail वापरकर्त्यांना मिळणार फायदा, काम होणार अधिक सोपे
Apple आता भारतात iPhone 16 Pro आणि iPhone 16 Pro Max यासह संपूर्ण iPhone 16 लाइनअपचे प्रोडक्ट्स तयार करत आहे. Apple ने 2017 मध्ये भारतात आयफोनचे उत्पादन सुरू केले होते.
Apple ने गेल्या महिन्यात आपला नवीनतम iPhone 16 लाइनअप लाँच केला. आता सांगितलं जात आहे की कंपनी आपल्या परवडणाऱ्या iPhone SE चे नवीन व्हर्जन लाँच करण्याच्या तयारीत आहे. कंपनीने 2016 मध्ये पहिल्यांदा iPhone SE लाँच केला होता. त्याचे दुसरे व्हेरिएंट 2020 मध्ये आणि तिसरे व्हेरिएंट 2022 मध्ये लाँच करण्यात आले. त्यांनतर आता iPhone SE चा चौथा व्हेरिएंट लाँच केला जाणार आहे.
2025 मध्ये चौथे व्हेरिएंट लाँच केले जाऊ शकते. iPhone SE 4 चे डिझाईन आयफोन 14 सारखे असू शकते. iPhone SE 4 अनेक अपग्रेडसह लाँच केला जाईल. हार्डवेअरमध्ये व्यापक बदल केले जाऊ शकतात, असा दावा अहवालात केला जात आहे. यासोबतच फोनचा डिस्प्लेही मोठा असेल. काही रिपोर्ट्समध्ये असा दावा केला जात आहे की यामध्ये Apple Intelligence सपोर्ट देखील दिला जाऊ शकतो.