फोटो सौजन्य -iStock
देशात ड्रिंक अँड ड्राईव्हच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. ड्रींक अँड ड्राईव्हचं सर्वात गाजलेलं प्रकरण म्हणजे पुणे पोर्श कार. या अपघातात 2 जणांनी त्यांचा जीव गमावला आणि ड्रींक अँड ड्राईव्ह करणारा आरोपी अल्पवयीन असल्याने त्याला निंबध लिहिण्याची शिक्षा देण्यात आली होती. अल्पवयीन आरोपीला दिलेल्या या शिक्षेमुळे पुणे पोर्श कार प्रकरण मोठ्या प्रमाणात गाजलं. पण या घटनेत आरोपी नक्की मद्यधुंद अवस्थेत गाडी चालवत होता का, याचा शोध घेण्यासाठी खूप वेळ लागला. त्यामुळे या प्रकरणात अनेक ट्विस्ट समोर येत गेले.
हेदेखील वाचा- लवकरच लाँच होणार आहे Xiaomi 14 Civi Limited Edition! पांडाप्रेमींसाठी असेल खास डिझाईन
पण आता एक असा AI कॅमेरा लाँच केला जाणार आहे, जो केवळ तुमचा चेहरा बघून तुम्ही दारू पिऊन गाडी चालवली की नाही हे सांगणार आहे. त्यामुळे आता ड्रींक अँड ड्राईव्ह प्रकरणात आरोपीच्या रक्ताची चाचणी करण्याआधी हा AI कॅमेरा सत्य उघड करू शकतो. या नवीन AI अल्गोरिदमच्या माध्यमातून देण्यात आलेला रिपोर्ट 75 टक्के अचूक असू शकतो, असा दावा संशोधकांनी केला आहे. थर्टी फर्स्ट, ख्रिसमस अशा वेळी ड्रींक अँड ड्राईव्हच्या घटना मोठ्या प्रमाणात घडतात. पण आता ह्या नव्या AI अल्गोरिदमच्या माध्यमातून ड्रींक अँड ड्राईव्ह घटनांना आळा घालण्यासाठी मदत होणार आहे.
हेदेखील वाचा- Jio ने 1799 च्या किंमतीत लाँच केला UPI सपोर्ट आणि मोठी स्क्रीन असलेला फोन
इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअर्स आणि कॉम्प्युटर व्हिजन फाउंडेशन कॉन्फरन्स या AI प्रकल्पावर एकत्र काम करत आहेत. हा AI कॅमेरा संगणक स्टीयरिंग पॅटर्न, पेडल वापरणे आणि वाहनाचा वेग यासारख्या निरीक्षणात्मक वर्तनावर कार्य करतो. जेव्हा कार हलत असेल तेव्हाच ह्या कॅमेऱ्यामध्ये डेटा गोळा केला जाऊ शकतो. हा नवीन AI प्रोजेक्ट सिंगल कलर कॅमेरा वापरतो जो टक लावून पाहण्याची दिशा आणि डोक्याची स्थिती यांचे निरीक्षण करतो. हा AI कॅमेरा ड्रायव्हर स्टिअरिंगचा वापर कसा करत आहे ते त्याच्या चेहऱ्यावरील हावभावांपर्यंत सर्व काही रेकॉर्ड करणार आहे.
Edith Cowan University चे एक डॉक्टरेटचे विद्यार्थी Ensiyeh Keshtkaran यांनी सांगितलं की, ड्रायव्हिंगच्या अगदी सुरुवातीला नशेची पातळी काय आहे हे शोधण्याची क्षमता आमच्या सिस्टममध्ये आहे. या अल्गोरिदमच्या माध्यमातून भविष्यात होणारे अपघात टाळता येतील. जागतिक आरोग्य संघटनेच्या (world health organization) मते, जगातील 20 ते 30 टक्के गंभीर कार अपघातांमागे दारू पिऊन वाहन चालवणे हे प्रमुख कारण आहे. पण आता AI अल्गोरिदमच्या मदतीने भविष्यात होणारे अपघात टाळता येतील.