तुम्हाला रोजच्या वापरासाठी चांगले ब्रँडेड आणि स्वस्त इअरबड्स घ्यायचे असतील तर ही बातमी तुमच्यासाठीच आहे. ऍमेझॉनवर सध्या ग्रैंड गेमिंग डेज सेल सुरु आहे. या सेलमध्ये ग्राहकांना पीसी, कीबोर्ड, हेडफोन्स, स्पीकरवर अशा अनेक इलेकट्रोनिक वस्तूंवर विशेष सूट मिळत आहे. ऑफर बॅनरवर असे लिहिले आहे की, सेलमध्ये खरेदीवर 50% पर्यंतची सूट मिळू शकते. जरी इथे अनेक डील आणि सवलती दिल्या जात आहेत, परंतु बेस्टबद्दल बोलायचे केले तर, सर्वात जास्त विक्री होणारे हेडफोन आणि स्पीकर इथे 75% पर्यंत सवलतीत खरेदी केले जाऊ शकतात. या लिस्टमध्ये कोणते हेडफोन आणि इअरबड्स आहेत ते जाणून घेऊयात.
[read_also content=”भारतात सॅमसंगकडून क्लासी Galaxy F55 5G फोन जबरदस्त फीचर्ससह लाँच! https://www.navarashtra.com/technology/samsung-launches-galaxy-f55-5g-phone-with-amazing-features-in-india-539285.html”]
ग्राहकांना ऍमेझॉनवर boat Airdopes 170 हा 4,490 रुपयांऐवजी 1,099 रुपयांना खरेदी करता येणार आहे. या इअरबड्सचा प्लेटाइम 50 तासांचा आहे आणि त्यात 13mm ड्रायव्हर मिळत आहे. Noise Buds N1 ऍमेझॉन सेलमध्ये 3,499 रुपयांऐवजी 1,399 रुपयांना खरेदी करता येत आहे. हा इअरबर्ड ४० तासांच्या प्लेटाइमसह येतो. यासोबतच, यात ENC सह क्वाड माइकसुद्धा दिला जातोय. यामध्येच Boult Z40 ग्राहकांना 4,999 रुपयांऐवजी 1,399 दिला जात आहे. हा इयरबड 60 तासांच्या प्लेटाइमसह येतो आणि यात 10mm रिच बेस दिला जातो.
याच सेलमध्ये JBL Tune 235NC हा 9,999 रुपयांऐवजी 3,999 रुपयांना उपलब्ध करून दिला जात आहे. हा इअरबर्ड 40 प्लेटाइमसह मिळत असून यात गुगल फास्ट पेयर सारखी वैशिष्ट्ये उपलब्ध आहेत. बोट Rockerz 205 Pro ऍमेझॉनवर 2,499 रुपयांऐवजी 1,099 रुपयांना खरेदी करता येईल. हा30 तसांचा प्लेटाइम देते. तसेच इथे Boat Immortal 121 हा इअरबर्ड 3,499 रुपयांऐवजी 1,099 रुपयांना विकला जात आहे. या इअरबर्डचा प्लेटाइम 40 तासांचा आहे.