BSNL घेऊन आलाय ढासू प्लॅन! 6 महिने रिचार्जचं नो टेंशन, कमी किंमतीत मिळणार 90GB डेटा आणि अनलिमिटेड कॉलिंग!
भारतातील सरकारी टेलिकॉम कंपनी बीएसएनएल नेहमीच त्यांच्या ग्राहकांसाठी नवीन रिचार्ज प्लॅन घेऊन असते. या रिचार्ज प्लॅनमध्ये ग्राहकांना कॉलिंग आणि डेटा ऑफर केला जातो. खरं तर बीएसएनएलचे प्लॅन त्यांच्या लाँग टर्म व्हॅलिडीटीमुळे अधिक लोकप्रिय आहे. कारण जिथे दुसऱ्या कंपन्या अधिक पैसे घेऊन लाँग टर्म व्हॅलिडीटी ऑफर करतात, त्याचवेळी बीएसएनएल त्यांच्या ग्राहकांना कमी पैशांत लाँग टर्म व्हॅलिडीटीवाले प्लॅन ऑफर करतात.
आता देखील कंपनीने त्यांच्या ग्राहकांसाठी एक नवीन प्लॅन लाँच केला आहे. या प्लॅनची व्हॅलिडिटी 6 महिन्याची आहे. कंपनीचा हा प्लॅन वॅल्यू फॉर मनी प्रीपेड प्लॅन आहे. म्हणजेच या प्लॅनमध्ये ग्राहकांना कमी पैशांत लाँग टर्म व्हॅलिडीटी ऑफर केली जाते. कंपनीचा हा नवीन प्लॅन भारतातील खाजगी टेलिकॉम कंपन्यांना नक्कीच टक्कर देणार आहे. चला तर मग आता बीएसएनएलने लाँच केलेल्या या प्लॅनची किंंमत आणि त्याचे फायदे सविस्तर जाणून घेऊया.(फोटो सौजन्य – Pinterest)
कंपनीने लाँच केलेल्या या प्लॅनची व्हॅलिडीटी 6 महिन्यांची म्हणजेच 180 दिवसांची आहे. या प्लॅनची किंमत 897 रुपये आहे. जर तुम्हाला दर महिन्याला रिचार्ज करून कंटाळा आला असेल आणि पैशांची बचत करायची असेल तर तर हा नवीन प्लॅन बेस्ट आहे. या प्लॅनमध्ये युजर्सना केवळ 897 रुपयांमध्ये 6 महिन्यांची व्हॅलिडीटी मिळणार आहे. म्हणजेच 6 महिने तुम्हाला रिचार्जचं नो टेंशन.
बीएसएनएलच्या या जबरदस्त प्लॅनमध्ये युजर्सना लॉन्ग-टर्म व्हॅलिडीटी दिली जाते, यासाठी जास्त पैसे खर्च करण्याची देखील गरज नाही. शिवाय यामध्ये कोणत्याही नेटवर्कवर अनलिमिटेड कॉलिंगची सुविधा देखील दिली जाते.
या प्लॅनची सर्वात खास गोष्ट म्हणजे या प्लॅनमध्ये कोणतीही डेटा लिमिट सेट करण्यात आली नाही. या प्लॅनमध्ये तुम्ही 180 दिवसांसाठी 90 GB डेटाचा वापर करू शकता. म्हणजेच रोजच्या डेटा वापरावर कोणतीही लिमिट सेट करण्यात आलेली नाही. इतर टेलिकॉम ऑपरेटर दैनंदिन डेटा वापरावर मर्यादा देत असताना, बीएसएनएल येथेही त्यांच्या वापरकर्त्यांना फायदे देत आहे. अशा परिस्थितीत, तुम्ही हा डेटा एका आठवड्यात वापरायचा की संपूर्ण 6 महिन्यांत, हे पूर्णपणे तुमच्यावर अवलंबून आहे.
सेकेंड-हँड iPhone ची वाढतेय क्रेझ! तुम्हीही खरेदी करण्याचा विचार करताय? लक्षात ठेवा ‘या’ Useful Tips
खाजगी कंपन्यांचे असे अनेक प्लॅन आहेत, जिथे युजर्सना रोजच्या डेटा वापरावर मर्यादा ठेवली जाते. मात्र बीएसएनएलच्या या प्लॅनमध्ये युजर्सना डेटा वापरावर कोणतीही मर्यादा नाही.
प्लॅनमध्ये केवळ 90GB डेटा आणि अनलिमिटेड कॉलिंगचीच सुविधा नाही तर फ्री SMS ची सुविधा देखील दिली जाते. या प्लॅनमध्ये युजर्सना रोज फ्री 100 SMS ची सुविधा दिली जाते.