तुमचं बँक अकाऊंट धोक्यात! नवा Malware करत आहे पैशांची चोरी, असा केला जातोय पैशांचा कांड...
तुम्हीही ऑनलाइन बँकिंग किंवा क्रिप्टोकरेंसीचा वापर करताय का? तर वेळीच सावध व्हा, अन्यथा तुमचं मोठं नुकसान होऊ शकतं. सध्या एक धोकादायक मालवेअरबाबत माहिती समोर आली आहे, जो तुमचे बँक डिटेल्स चोरून तुमच्या खात्यातून पैसे लंपास करत आहे. तुमचे बँकिंग आणि वॉलेट डिटेल्स चोरण्यासाठी विंडोजच्या फीचरचा वापर केला जात आहे. या धोकादायक मालवेअरचं नाव Coyote आहे. या मालवेअरबाबत सायबर सिक्योरिटी फर्म Akamai ने इशारा दिला आहे.
Coyote नावाचे हे मालवेअर विंडोजच्या UI ऑटोमेशन फ्रेमवर्कचा वापर करते. हे फीचर सामान्यत: डिसेबिलिटी टूल्ससाठी डिझाईन करण्यात आलं होतं. मात्र आता या फीचरद्वारे मालवेअर तुमची ऑनलाइन बँकिंग किंवा क्रिप्टोकरेंसी माहिती चोरी करत आहेत? तुम्ही कोणत्या वेबसाइटला भेट देत आहात, विशेषतः तुमच्या बँकिंग पोर्टल साइट्स आणि क्रिप्टो एक्सचेंज साइट्स, या सगळ्यावर लक्ष ठेऊन Coyote तुमती माहिती चोरतो. (फोटो सौजन्य – Pinterest)
ही सर्व माहिती कमांड एंड कंट्रोल (C2) सर्वरला पाठवली जाते, जेथे साइबर क्रिमिनल्स ही संपूर्ण माहिती अगदी सहजपणे अॅक्सेस करू शकतात.
Coyote मालवेअर अतिशय चालाख आहे आणि हे तुमची माहिती चोरण्यासाठी वेगवेगळ्या पद्धतींचा वापर करतो.
सध्या या मालवेअरचे लक्ष ब्राझीलवर असल्याचं सांगितलं जात आहे. मात्र तज्ज्ञांचं मत आहे की, सायबर गुन्हेगारांची ही एक सामान्य रणनीती आहे. ते प्रथम एका देशात मालवेअरची चाचणी करतात आणि नंतर ते जगभरात वापरतात. ज्यामुळे जगभरातील लोकं या मालवेअरच्या जाळ्यात अडकतात. भारतातील मोठ्या संख्येने लोकं ऑनलाइन बँकिंग आणि डिजिटल वॉलेट्सचा वापर करतात. अशा परिस्थितीत Coyote भारतीयांसाठी एक मोठा धोका बनू शकतो.