पहिल्यांदाच घसरली Samsung Galaxy S26 Ultra ची किंमत! हजारो रुपयांनी स्वस्त झाला प्रीमियम फोन, वाचा ऑफर्स
सॅमसंग गॅलेक्सी एस 26 अल्ट्रा स्मार्टफोन 12GB+ 256GB, 12GB + 512GB आणि 16GB + 1TB या तीन व्हेरिअंटमध्ये लाँच करण्यात आला आहे. या स्मार्टफोनच्या 12GB+ 256GB या बेस व्हेरिअंटची किंमत 1,39,999 रुपये ठेवण्यात आली आहे. तर 12GB + 512GB व्हेरिअंटची किंमत 1,59,999 रुपये आणि 16GB + 1TB व्हेरिअंटची किंमत 1,89,999 रुपये ठेवली आहे. स्मार्टफोनच्या बेस व्हेरिअंटवर ग्राहकांना सुमारे 9 हजार रुपयांचे डिस्काऊंट ऑफर केले जाणार आहे. यामुळे आता अल्ट्रा फोन ग्राहक केवळ 1,30,999 रुपयांच्या सुरुवातीच्या किंमतीत घरी घेऊन येणार आहेत. (फोटो सौजन्य – Pinterest)
Samsung Galaxy S26 Ultra मध्ये 6.9 इंच डायनॅमिक एलटीपीओ अमोलेड डिस्प्ले देण्यात आला आहे. फोनचा डिस्प्ले 120Hz रिफ्रेश रेटला सपोर्ट करतो. सॅमसंगच्या या प्रिमियम स्मार्टफोनमध्ये अल्ट्रासोनिक फिंगरप्रिंट सेंसर देण्यात आला आहे. सॅमसंगच्या या फोनमध्ये क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 8 एलिट जेन 5 प्रोसेसर देण्यात आला आहे. या स्मार्टफोनमध्ये 60W फास्ट चार्जिंग आणि वायरलेस चार्जिंग फीचरसह 5,000mAh बॅटरी देण्यात आली आहे.
Google ची मोठी घोषणा! Gemini AI अॅप आता macOS साठी लाँच, मॅक यूजर्सना मिळणार जबरदस्त फीचर्स
Galaxy S26 Ultra च्या मागील बाजूला क्वाड कॅमेरा सेटअप दिला आहे. या फोनमध्ये 200MP चा मुख्य कॅमेरा देण्यात आला आहे. याशिवाय या स्मार्टफोनमध्ये 50MP चा पेरीस्कोप कॅमेरा दिला आहे. या प्रिमियम डिव्हाईसमध्ये 10MP चा टेलीफोटो आणि 50MP चा अल्ट्रा वाइड कॅमेरा दिला आहे. प्रिमियम स्मार्टफोनमध्ये सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी 12MP चा कॅमेरा दिला आहे. कंपनीने या डिव्हाईसमध्ये S-Pen दिला आहे. हा स्मार्टफोन अँड्रॉईड 16 वर बेस्ड OneUI 8.5 वर चालतो.






