JIO Recharge Plan: किंमत कमी अन् फायदे भरपूर! केवळ इतक्या रुपयांत मिळणार महिनाभराची व्हॅलिडीटी आणि JioHotstar अॅक्सेस
जिओने त्यांच्या वेबसाईटवर हा स्वस्त रिचार्ज प्लॅन क्रिकेट डेटा पॅकअंतर्गत लिस्ट केला आहे. या प्लॅनमध्ये मिळणाऱ्या फायद्यांबद्दल बोलायचं झालं तर यूजर्सना या स्वस्त प्लॅनमध्ये अनेक मोठे फायदे मिळणार आहेत. 149 रुपयांचा स्वस्त प्लॅन खरेदी करणाऱ्या यूजर्सना 10GB डेटा ऑफर केला जाणार आहे. या प्लॅनमध्ये कॉलिंग आणि एसएमएसचे फायदे ऑफर केले जाणार नाहीत. ज्या यूजर्सना जास्त डेटाची आवश्यकता असते किंवा ज्या यूजर्सचा डेटा वेळेपूर्वीच संपतो अशा यूजर्ससाठी हा क्रिकेट पॅक लाँच करण्यात आला आहे. (फोटो सौजन्य – Pinterest)
रिलायंस जियो त्यांच्या 149 रुपयांच्या स्वस्त रिचार्ज प्लॅनमध्ये 90 दिवसांसाठी जिओहॉटस्टारचे मोबाईल सब्सक्रिप्शन ऑफर करत आहे. म्हणजेच यूजर्सना केवळ 149 रुपयांत तीन महिन्यांसाठी जिओहॉटस्टारचा अॅक्सेस मिळणार आहे. जिओहॉटस्टारवर यूजर्स क्रिकेटव्यतिरिक्त चित्रपट आणि वेबसीरीजचा देखील आनंद घेऊ शकणार आहेत.
कंपनीच्या पोर्टफोलिओमध्ये 149 रुपयांच्या स्वस्त प्लॅनव्यतिरिक्त 195 रुपयांचा क्रिकेट डेटा पॅक देखील उपलब्ध आहे. या प्लॅनमध्ये देखील यूजर्सना 30 दिवसांची व्हॅलिडिटी आणि जिओहॉटस्टारचा अॅक्सेस ऑफर केला जाणार आहे. 195 रुपयांच्या क्रिकेट डेटा पॅकची खास गोष्ट अशी आहे की, यूजर्सना या प्लॅनमध्ये 15GB हाय स्पीड डेटाचा फायदा मिळणार आहे. या प्लॅनमध्ये देखील यूजर्सना 90 दिवसांसाठी जिओहॉटस्टारचे मोबाईल सब्सक्रिप्शन ऑफर केले जाणार आहे.
जिओने अलीकडेच एक स्वस्त रिचार्ज प्लॅन लाँच केला आहे. या रिचार्ज प्लॅनची किंमत 189 रुपये आहे. या रिचार्ज प्लॅनमध्ये यूजर्सना 28 दिवसांची व्हॅलिडीटी ऑफर केली जाणार आहे. 189 रुपयांच्या या प्लॅनमध्ये यूजर्सना संपूर्ण भारतात अनलिमिटेड कॉलिंग आणि फ्री नॅशनल रोमिंगचे फायदे मिळार आहेत. कंपनीच्या या प्लॅनमध्ये 2GB डेटा आणि डेली 100 फ्री एसएमएस देखील मिळणार आहेत.






