सर्वसामान्यांसाठी सुरु झाला Amazon आणि Flipkart सेल! डिस्काऊंट आणि ऑफर्ससह खरेदीची संधी चुकवू नका
सर्वसामन्यांसाठी देखील Amazon आणि Flipkart सेल आता सुरु झाला आहे. 27 सप्टेंबर रोजी रात्री 12 वाजल्यापासून सर्वांसाठी Amazon Great Indian Festival आणि Flipkart Big Billion Days Sale सुरु झाला आहे. तर हा सेल प्राईम आणि प्लस मेंबर्ससाठी एक दिवस आधीच म्हणजेच 26 सप्टेंबर रोजी रात्री 12 वाजल्यापासूनच सुरु झाला होता. या सेलमध्ये तुम्हाला स्मार्टफोन, टॅबलेट, आयफोन, स्मार्ट टिव्ही, स्मार्ट वॉच, फ्रीज, वॉशिंग मशिन आणि एसी या सर्व वस्तूंवर डिस्काऊंट मिळणार आहे.
हेदेखील वाचा- Amazon-Flipkart Sale 2024: नवीन स्मार्ट टिव्ही घेण्याचा विचार करताय? मग Amazon-Flipkart सेल आहे ना, आत्ताच खरेदी करा
तुम्ही तुमच्या घरासाठी नवीन वस्तू घेण्याचा विचार करत असाल तर Amazon Great Indian Festival आणि Flipkart Big Billion Days Sale एक चांगली संधी ठरू शकते. या सेलमध्ये तुम्हाला वॉशिंग मशिनवर 60 टक्के, रेफ्रिजरेटरवर 55 टक्के, एसी आणि घरगुती उपकरणांवर 55 टक्के, मायक्रोवेव्ह आणि किचन चिमणीवर 65 टक्के, स्मार्टफोनवर 40 टक्के, स्मार्ट वॉचवर 60 टक्के, स्मार्ट टिव्हीवर 50 टक्के डिस्काऊंट मिळणार आहे. (फोटो सौजन्य – pinterest)
Samsung Galaxy A14 5G या सेलमध्ये कमी किंमतीत खरेदी करण्याची संधी तुम्हाला मिळणार आहे. या सेलमध्ये ग्राहकांना iPhone 15 Pro, iPhone 15 Pro Max तसेच POCO स्मार्टफोन्सवर जबदस्त डिस्काऊंट मिळणार आहे. सेलमध्ये iPhone 15 Pro चे बेस व्हेरिएंट 89,999 किमतीत तुम्ही खरेदी करू शकता. iPhone 15 Pro केवळ 1,09,999 रुपयांना उपलब्ध असणार आहे.
Amazon Great Indian Festival 2024 आणि Flipkart Big Billion Days Sale मध्ये तुम्ही Thomson, Infinix, Kodak , फॉक्सस्की आणि Mark यांसारख्या चांगल्या ब्रँडचे टीव्ही कमी किंमतीत खरेदी करू शकता. सेलमध्ये Thomson चा स्मार्टटिव्ही 5,999 रुपयांच्या किंमतीत उपलब्ध आहे. Infinix च्या HD Ready Smart LED Linux TV 2024 एडिशनवर 55% चे डिस्काऊंट मिळत आहे. Kodak स्मार्ट टीव्ही 46% डिस्काउंटसह फक्त 7,999 रुपयांमध्ये खरेदी करण्याची संधी मिळणार आहे. 1 लाखापेक्षा जास्त किंमतीचा 55 इंच TCL स्मार्ट टीव्ही आता फक्त 36990 रुपयांमध्ये खरेदी करू शकता.
हेदेखील वाचा- Flipkart Big Billion Days Sale 2024: बिग बिलियन डेजमध्ये आयफोन आणि POCO स्मार्टफोन कमी किंमतीत खरेदी करण्याची संधी!
ASUS Vivobook 15 हा Intel i5 लॅपटॉप आहे. त्याची किंमत 69,990 रुपये आहे. परंतु सेलमध्ये हा लॅपटॉप तुम्ही केवळ 36,990 रुपयांमध्ये खरेदी करू शकता. Chromebook Plus हा एक AI आधारित लॅपटॉप आहे, जो 49,990 रुपयांना उपलब्ध आहे. पण सेलमध्ये त्याची किंमत 21,490 रुपये ठेवण्यात आली आहे. Acer Swift Go 14 ची किंमत 93,999 रुपये आहे, परंतु तुम्ही सेलमध्ये हा लॅपटॉप 49,990 रुपयांना उपलब्ध आहे. HP Pavilion ची किंमत 78,189 रुपये असली तरी सेलमध्ये त्याची किंमत 49,990 रुपये आहे.
एक चांगला मायक्रोवेव्ह ओव्हन ग्रिलिंगपासून बेकिंगपर्यंत, अन्न पटकन शिजवण्यापासून अन्न गरम करण्यापर्यंत सर्व गोष्टींमध्ये मदत करतो. जर तुम्ही मायक्रोव्हेव आतापर्यंत घेतले नसेल आणि फक्त घेण्याचा विचार करत असाल तर तुम्हाला यापेक्षा चांगलाी संधी मिळणार नाही. सेलमध्ये अनेक ब्रँडेड मायक्रोवेव्हवर मोठ्या प्रमाणात सूट मिळत आहे
उष्मा आणि दमट हवामान सध्या तरी आपली साथ सोडताना दिसत नाही. पंखे आणि कुलरसुद्धा तुमची समस्या सोडवू शकत नसतील तर आता एअर कंडिशनर वापरण्याची वेळ आली आहे. तुमची ही गरज पूर्ण करण्यासाठी सेलमध्ये AC वर 55% पर्यंत बंपर सवलत आणली आहे जेणेकरून तुम्हाला एअर कंडिशनर खरेदी करण्यापूर्वी बजेटची जास्त काळजी करण्याची गरज नाही.