Amazon-Flipkart Sale 2024: नवीन स्मार्ट टिव्ही घेण्याचा विचार करताय? मग Amazon-Flipkart सेल आहे ना, आत्ताच खरेदी करा
प्राईम मेंबर्ससाठी Amazon Great Indian Festival 2024 आणि प्लस मेंबर्ससाठी Flipkart Big Billion Days Sale 2024 सुरु झाला आहे. तर आज 27 सप्टेंबर रोजी रात्री 12 वाजल्यापासून सर्वसामान्यांसाठी देखील Amazon Great Indian Festival 2024 आणि Flipkart Big Billion Days Sale 2024 सुरु होणार आहे. या सेलमध्ये तुम्हाला उत्तम ब्रँडच्या स्मार्ट टिव्हीवर आकर्षक डिस्काऊंट मिळणार आहे. सेलमध्ये तुम्ही Thomson, Infinix, Kodak , फॉक्सस्की आणि Mark यांसारख्या चांगल्या ब्रँडचे टीव्ही देखील कमी किंमतीत खरेदी करू शकता. एवढेच काय तुम्ही केवळ 6000 रुपयांच्या किंमतीत स्मार्ट टिव्ही खरेदी करू शकता. (फोटो सौजन्य – pinterest)
Thomson कंपनी सेल दरम्यान आपला Thomson 24 Alpha 001 स्मार्ट टीव्ही फक्त 5,999 रुपयांना विकत आहे. हा टीव्ही अतिशय स्वस्त आहे आणि स्मार्ट टीव्हीमध्ये असणारी सर्व फीचर्स यामध्ये उपलब्ध आहेत. तुम्ही बँके ऑफरचा फायदा घेतल्यास, हा टीव्ही तुम्ही अगदी स्वस्तात खरेदी करू शकता.
हेदेखील वाचा- Flipkart Big Billion Days Sale 2024: बिग बिलियन डेजमध्ये आयफोन आणि POCO स्मार्टफोन कमी किंमतीत खरेदी करण्याची संधी!
Infinix कंपनी त्यांच्या HD Ready Smart LED Linux TV 2024 एडिशनवर 55% चे डिस्काऊंट देत आहे. आधी या टीव्हीची किंमत 16,999 रुपये होती, पण आता तुम्ही फक्त 7,500 रुपयांमध्ये हा टिव्ही खरेदी करू शकता आणि जर तुम्ही बँक ऑफरचा फायदा घेतला तर तुम्ही यापेक्षाही स्वस्त खरेदी करू शकता.
Kodak कंपनी आपल्या नवीन स्मार्ट टीव्ही 2024 मॉडेलवरही मोठी सूट देत आहे. आधी या टीव्हीची किंमत 14,999 रुपये होती, पण आता तुम्ही 46% डिस्काउंटसह फक्त 7,999 रुपयांमध्ये खरेदी करू शकता.
जर तुम्ही टीव्ही अपग्रेड करण्याचा विचार करत असाल, तर Vu ने 50 इंच Vu 126cm, Vibe Series QLED Google TV आणला आहे, जो पाहिल्यानंतर तुम्हाला आणखी काही पाहण्याची इच्छा होणार नाही. 4K रिझोल्यूशनसह, तुम्हाला 4K क्वांटम डॉट तंत्रज्ञान मिळेल. याशिवाय इंटिग्रेटेड साउंडबार तुमचा टीव्ही पाहण्याचा अनुभव अगदी मजेदाक बनवतो. व्हॉईस क्लॅरिटी साइनबार, डायनॅमिक बॅकलाइट कंट्रोल, क्रिकेट मोड, 2 जीबी रॅम आणि 1 जीबी स्टोरेज देखील आहे
1 लाखापेक्षा जास्त किंमतीचा 55 इंच TCL स्मार्ट टीव्ही आता फक्त 36990 रुपयांमध्ये खरेदी करण्याची संधी तुम्हाला मिळणार आहे. जर तुम्ही घरी सिनेमा हॉलसारखा अनुभव घेण्याचा विचार करत असाल, तर TCL ने तुमचे काम सोपे केले आहे. TCL च्या 55 इंच स्मार्ट टीव्हीमध्ये तुम्हाला हवे ते सर्व मिळेल. 4k रेझोल्यूशन व्यतिरिक्त, 2GB रॅम, डॉल्बी व्हिजनसह 32GB रॉम आणि हँड्स-फ्री व्हॉईस कंट्रोल देखील आहे.