Flipkart Scam: कन्फर्म केलेली ऑर्डर होतेय कॅन्सल, Flipkart वर भडकले ग्राहक
ई कॉमर्स प्लॅटफॉर्म फ्लिपकार्टवर बिग बिलीयन डे सेल सुरु आहे. या सेलमध्ये तुम्हाला स्मार्टफोन, टॅबलेट, आयफोन, स्मार्ट टिव्ही, स्मार्ट वॉच, फ्रीज, वॉशिंग मशिन आणि एसी या सर्व वस्तूंवर डिस्काऊंट मिळणार आहे. त्यामुळे या संधीचा ग्राहक पुरेपूर फायदा घेत आहेत. अनेकांना त्यांनी ऑर्डर केलेल्या वस्तू स्वस्त दरात आणि चांगल्या क्वालिटीसह मिळत आहेत. त्यामुळे अनेक ग्राहकांनी फ्लिपकार्टला चांगली रेटिंग दिली आहे. मात्र अनेकांनी फ्लिपकार्टच्या सेवेबद्दल नाराजी व्यक्त केली आहे. सेल दरम्यान फ्लिपकार्ट ग्राहकांची फसवूणक करत असल्याचे म्हटले जात आहे. याचे काही मिम्स देखील सोशल मिडीयावर व्हायरल झाले आहेत.
हेदेखील वाचा- Amazon-Flipkart Sale 2024: Flipkart-Amazon सेलमधून iPhone विकत घेतला! पण MFNP तपासले का? नंतर पश्चाताप नको
खरं तर, अनेक लोक तक्रार करत आहेत की त्यांनी Flipkart बिग बिलीयन डे सेलमध्ये वस्तू मागवल्या, पण कंपनीने त्यांची ऑर्डर रद्द केली. अशा स्थितीत लोकांमध्ये कंपनीबाबत नाराजी पसरली आहे. ऑर्डर रद्द करायची होती, तर कन्फर्म तरी का केली? असा सवाल ग्राहकांनी उपस्थित केला आहे. फ्लिपकार्ट ग्राहकांची फसवूणक करत असल्याचा आरोप देखील अनेकांनी केला आहे. (फोटो सौजन्य – pinterest)
सोशल मीडियावर अनेक यूजर्स आहेत ज्यांनी याबाबत पोस्ट केली आहे. लोक याला फ्लिपकार्टचा मोठा घोटाळा म्हणत आहेत . फ्लिपकार्ट आपल्या ग्राहकांना फसवत असल्याचे अनेक सोशल मिडीया वापरकर्त्यांनी म्हटले आहे. सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर फ्लिपकार्ट स्कॅम देखील ट्रेंड करू लागला आहे. तुम्हीही या सेलमधून काही ऑर्डर करण्याचा विचार करत असाल तर काळजी घ्या. अन्यथा तुम्हाला सुध्दा नुकसानीला सामोरं जावं लागू शकतं.
My order automatically cancelled by Flipkart @Flipkart @flipkartsupport
Flipkart renamed to be scamkart #flipkartscam #flipk pic.twitter.com/SM1yh95uZQ— Ascetic 🇮🇳 (@Harishmeena96) October 2, 2024
#flipkartscam, This scam won’t stop until we raise our voice against them. In DMs they just say that the stock was not available. Then why did you take orders and money? Look at the SS and Video. How many orders did Flipkart cancel. @flipkartsupport @Flipkart pic.twitter.com/Dp5KibDLj9
— Shah Rukh (@2050Shahrukh) October 2, 2024
हेदेखील वाचा-सर्वसामान्यांसाठी सुरु झाला Amazon आणि Flipkart सेल! डिस्काऊंट आणि ऑफर्ससह खरेदीची संधी चुकवू नका
सोशल मीडियावर यूजर्स आपला संताप व्यक्त करत आहेत. एक्सवरील युजर वंदना सोनकर यांनी लिहिले की, फ्लिपकार्टचा मोठा घोटाळा समोर आला आहे. ऑफर्सच्या नावाखाली ग्राहकांची फसवणूक केली जात आहे. ऑर्डर रद्द करत आहे! प्रश्न असा पडतो की ऑर्डर रद्द करावी लागत असेल तर ही ऑफर का देण्यात आली?
#flipkartscam
My order got cancelled saying went out of stock, but the item was still available in my location even after cancellation.It’s my turn now, I’ve placed the order and once it gets shipped, when it’s halfway I’m gonna cancel it,revenge served cold🤣😂#flipkartscam pic.twitter.com/BuMNCsf1ji
— Selvakumar M (@samuelselva) October 2, 2024
फ्लिपकार्च स्कॅममुळे संतप्त झालेल्या एका युजरने ग्राहक न्यायालयात जाण्याबाबत लिहिले आहे. रुपक नावाच्या युजरने लिहिले की, मी फ्लिपकार्टवरून पुमा शूज ऑर्डर केले होते. जी ऑर्डर रद्द झाली. याबाबत मी ग्राहक न्यायालयात तक्रार करणार आहे. फ्लिपकार्टला टॅग करताना एका यूजरने लिहिले की, तुम्ही ग्राहकांच्या भावनांशी खेळत आहात. जेव्हा तुम्हाला ऑर्डर रद्द करावी लागते तेव्हा तुम्ही ही ऑफर ग्राहकांना का देता?
या संपूर्ण प्रकरणाबाबत फ्लिपकार्टकडून अद्याप कोणतेही अधिकृत वक्तव्य आलेले नाही. ज्या ग्राहकांचे ऑर्डर रद्द करण्यात आले ते ग्राहक कंपनीवर प्रचंड नाराज आहेत. ऑफर दिल्यानंतर ऑर्डर रद्द केल्यामुळे कंपनीला टीकेला सामोरे जावे लागत आहे. फ्लिपकार्टने ही समस्या लवकरात लवकर दूर करावी, अशी मागणी ग्राहकांनी केली आहे.