लवकरच लाँच होणार Google Pixel 9A स्मार्टफोन, 8GB रॅम आणि Google Tensor G4 चिपसेटने सुसज्ज
टेक जायंट कंपनी आणि स्मार्टफोन निर्माता कंपनी गुगल लवकरच नवीन स्मार्टफोन लाँच करणार आहे. गुगलच्या संदर्भात असे म्हटले जात आहे की कंपनी लवकरच आपल्या फ्लॅगशिप स्मार्टफोन Pixel 9 सीरीजचा एक स्वस्त फोन लाँच करू शकते. गुगलचा हा आगामी फोन Pixel 9A नावाने लाँच केला जाऊ शकतो. हा फोन लाँच होण्याआधीच त्याची संभाव्य वैशिष्ट्ये आधीच समोर आली आहेत. हा फोन 8 GB रॅम आणि Google Tensor G4 चिपसेटसह लाँच केला जाणार आहे.
हेदेखील वाचा- Google आणि Microsoft ची चिंता वाढली! OpenAI ने लाँच केलं सर्च इंजिन, युजर्सना मिळणार नवा ऑप्शन
गुगलने ऑगस्ट 2024 मध्ये Pixel 9 सिरीज लाँच केली होती. लाँच झाल्यापासून, वापरकर्ते Pixel 9 सिरीजच्या स्वस्त स्मार्टफोनची वाट पाहत आहेत. आता स्मार्टफोन युजर्सची ही इच्छा पूर्ण होणार आहे. कंपनी लवकरच Pixel 9A स्मार्टफोन लाँच करणार आहे. गुगलच्या आगामी Pixel 9a स्मार्टफोनचे काही स्पेसिफिकेशन्स आणि फीचर्स देखील समोर आले आहेत. या रिपोर्ट्समध्ये गुगलच्या आगामी फोनच्या फीचर्सची झलक पाहायला मिळते. येथे आम्ही तुम्हाला Pixel 9a लाँच होण्यापूर्वीच्या फीचर्सबद्दल सांगत आहोत. (फोटो सौजन्य – pinterest)
Android Headline च्या रिपोर्टनुसार, Pixel 9a स्मार्टफोनमध्ये 6.3-इंचाचा Actua डिस्प्ले दिला जाऊ शकतो. या डिस्प्लेमध्ये अडॅप्टिव्ह रिफ्रेश रेट (60Hz ते 120Hz) समर्थित असेल. हा गुगल स्मार्टफोन 8GB RAM सह Tensor G4 चिपसेट आणि 128GB आणि 256GB या दोन स्टोरेज पर्यायांसह ऑफर केला जाईल. Pixel 9a स्मार्टफोनमध्ये ड्युअल कॅमेरा सेटअप दिला जाईल. त्याचे कॅमेरा मॉड्यूल पुन्हा डिझाइन केले आहे.
डिस्प्ले – गुगलच्या या नवीन स्मार्टफोनमध्ये 6.3-इंचाचा डिस्प्ले ॲडॉप्टिव्ह रिफ्रेश रेटसह दिला जाऊ शकतो.
प्रोसेसर – Google Pixel 9A स्मार्टफोनमध्ये Google Tensor G4 चिपसेट असेल.
रॅम आणि स्टोरेज – हा नवीन स्मार्टफोन128GB आणि 256GB स्टोरेजसह 8GB रॅम ऑफर केला जाऊ शकतो.
हेदेखील वाचा- ॲपलनंतर गुगललाही झटका! या देशाने Google च्या Pixel स्मार्टफोनच्या विक्रीवर घातली बंदी
कॅमेरा – गुगलचा हा नवीन कॅमेरा 48 MP + 13 MP सह ऑफर केला जाऊ शकतो. तसेच या फोनमध्ये सेल्फी कॅमेरा 13 एमपीचा दिला जाऊ शकतो.
बॅटरी आणि चार्जिंग – हा स्मार्टफोन 5000 mAh बॅटरीने सुसज्ज असेल. स्मार्टफोन 18 W वायर्ड चार्जिंग सपोर्ट असू शकतो.
या गुगल फोनमध्ये 48-मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरा मिळू शकतो. यासोबतच फोनमध्ये 13 मेगापिक्सलची अल्ट्रा वाईड अँगल लेन्स दिली जाईल. या फोनच्या फ्रंटमध्ये 13-मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा उपलब्ध असेल. याशिवाय, Pixel 9a स्मार्टफोनमध्ये 5000 mAh बॅटरी आणि 18 W वायर्ड चार्जिंगचा सपोर्ट असेल.
या रिपोर्टमध्ये, Google Pixel 9A स्मार्टफोनच्या स्पेसिफिकेशन्ससह, संभाव्य किंमत देखील सांगण्यात आली आहे. या वर्षी कंपनी Pixel 9a स्मार्टफोनची किंमत वाढवण्याची शक्यता आहे. यापूर्वी, कंपनीने Pixel 8a भारतात 52,999 रुपयांच्या किंमतीत लाँच केला होता.
Google Pixel 9a स्मार्टफोन बद्दल असे सांगितले जात आहे की हा मार्च 2025 मध्ये लाँच केला जाऊ शकतो. पुढील वर्षी होणाऱ्या Google I/O इव्हेंटमध्ये आगामी स्मार्टफोनच्या हार्डवेअरबद्दल माहिती मिळू शकते.