चोराच्या हाती स्मार्टफोन लागताच लॉक होणार! गुगलने स्मार्टफोन युजर्ससाठी आणलं नवं फीचर
अँड्रॉइड युजर्सची सुरक्षा आणि गोपनीयता लक्षात घेऊन, गुगलने या वर्षाच्या सुरुवातीला थेफ्ट प्रोटेक्शन फीचर लाँच केलं होतं. वर्षाच्या सुरुवातीला हे नवीन फीचर लाँच झालं असलं तरी देखील अद्याप ते युजर्ससाठी रोलआऊट करण्यात आलं नव्हतं. आता अखेर कंपनीने हे फीचर काही निवडक देशांमधील युजर्ससाठी रोल आउट करण्यास सुरुवात केली आहे. तुमचा स्मार्टफोन चोरी झाला तरी देखील गुगलच्या या नवीन फीचरच्या मदतीने तुमचा डेटा पूर्णपणे सुरक्षित राहतो. येत्या काही दिवसांत हे फीचर सर्वांसाठी उपलब्ध करून दिलं जाणार आहे.
हेदेखील वाचा- गुगलने लाँच केले AI पॉवर्ड समरी कार्ड, Gmail वापरकर्त्यांना मिळणार फायदा, काम होणार अधिक सोपे
या वर्षाच्या सुरुवातीला गुगलने अँड्रॉइड युजर्ससाठी नवीन थेफ्ट प्रोटेक्शन फीचर लाँच करणार असल्याचं जाहीर केले होते. गुगलच्या नवीन वैशिष्ट्यांमध्ये थेफ्ट डिटेक्शन लॉक, ऑफलाइन डिव्हाइस लॉक आणि रिमोट लॉक यांचा समावेश आहे. कोणी तुमचा फोन चोरी केल्यानंतर बंद करण्याचा किंवा रिस्टार्ट करण्याचा प्रयत्न केला तर डिव्हाइस स्वतः लॉक होते. (फोटो सौजन्य – pinterest)
गुगलचे नवीन फीचर अमेरिकेतील युजर्ससाठी रोल आउट करण्यास सुरुवात झाली आहे. काही दिवसांपूर्वी ब्राझीलमध्येही याची ओळख झाली होती. हे फीचर येत्या काही दिवसांत सर्व देशांतील अँड्रॉइड युजर्ससाठी आणले जाईल अशी अपेक्षा आहे. हे फीचर्स Android 10 वरील सर्व डिव्हाईसवर उपलब्ध असेल.
अँड्रॉईड थेफ्ट डिटेक्शन लॉक फीचर चोरीला गेलेले फोन शोधण्यासाठी AI चा वापर करते. जर मॉडेलला चोरीशी संबंधित क्रिया जाणवली, तर ते फोन स्क्रीन आपोआप लॉक करते, जेणेकरून चोर तुमच्या स्मार्टफोनवरील डेटामध्ये सहज प्रवेश करू शकत नाहीत आणि डेटा सुरक्षित राहतो.
जर चोराने चोरीला गेलेले डिव्हाइस डिस्कनेक्ट करण्याचा प्रयत्न केला, तर ऑफलाइन डिव्हाइस लॉक फीचर डिव्हाइस ग्रिड बंद असले तरीही आपोआप स्क्रीन लॉक करते. हा लॉक झालेला स्मार्टफोन पुन्हा अनलॉक करण्यासाठी पिन टाकावा लागेल.
हेदेखील वाचा- Google for India 2024 Event: गुगलने करोडो भारतीयांना दिलं मोठं गिफ्ट, ईव्हेंटमध्ये केल्या या घोषणा
रिमोट लॉक फीचर तुम्हाला फक्त तुमचा फोन नंबर आणि क्विक सिक्योरिटी आव्हानासह दुसरे डिव्हाइस वापरून फोन लॉक करू देते. गुगलच्या मते, तुम्ही तुमचे गुगल अकाउंट वापरून Find My Device द्वारे फोन शोधू शकता.
याशिवाय अँड्रॉईडच्या फॅक्टरी रीसेट प्रोटेक्शनमध्ये गुगल डिव्हाईस रिसेट करणे कठीण करत आहे. नवीन अपग्रेड्सच्या आगमनाने, डिव्हाइस रीसेट करणे कठीण होईल. जर कोणी फोन रिसेट करण्याचा प्रयत्न केला तर त्याला गुगल अकाउंट क्रेडेंशियल्स भरावे लागतील.
टेक कंपन्यांनी त्यांच्या फोनमध्ये एक फीचर दिलं आहे. या फीचरमुळे पासवर्डविना फोन Switch Off करता येत नाही. Unlock to power OFF असं या फीचरचं नाव आहे.