WhatsApp चॅट्स झाले डिलीट? टेन्शन नको! Android आणि iPhone वर असे करा झटपट Restore
मेसेजिंग प्लॅटफॉर्म व्हॉट्सअॅप अँड्रॉइड आणि आयफोन या दोन्ही यूजर्सना त्यांचे चॅट्स गुगल ड्राईव्ह किंवा आयक्लाऊडमध्ये बॅकअप करून ठेवण्याची सुविधा देतो. त्यामुळे जर तुम्ही तुमच्या चॅट्सचे बॅकअप घेतले असेल तर तुम्ही अगदी सहज तुमच्या नवीन स्मार्टफोनमध्ये देखील व्हॉट्सअॅप चॅट्स पुन्हा मिळवू शकता. व्हॉट्सअॅप चॅट्सचे बॅकअप घेणे आणि चॅट्स रिस्टोअर करणे, याची प्रोसेस अगदी सोपी आहे. अँड्रॉइड स्मार्टफोन युजर्स त्यांच्या व्हॉट्सअॅप चॅट हिस्ट्रीचा बॅकअप गुगल अकाऊंटमध्ये घेऊ शकतात. तर आयफोनवरील चॅटचा बॅकअप घेण्यासाठी आणि रिस्टोअर करण्यासाठी iCloud चा वापर केला जातो. चॅटचा बॅकअप घेण्यासाठी तुम्हाला जास्तीत जास्त स्टोरेजची आवश्यकता असते त्यामुळे तुम्हाला पेड टीयर खरेदी करावे लागू शकते. (फोटो सौजन्य – Pinterest)






