नुकताच Google ने त्याच्या डेवलपर कॉन्फ्रेंसमध्ये घोषणा केली आहे की , Android 15 मध्ये टी काही अशी नवीन फीचर्स आणत आहेत जे यूजर्सचे फसवणूक आणि घोटाळ्यांपासून संरक्षण करतील. कंपनीचे म्हणणे आहे की, ती केवळ आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) च्या मदतीने फसवणूक रोखण्याचा प्रयत्न करत नाही तर Android 15 मध्ये विशेष सुरक्षा वैशिष्ट्ये देखील आणत आहे. या फीचर्सच्या मदतीने यूजर्सचा पर्सनल डेटा सुरक्षित राहील. आज आम्ही तुम्हाला याच नवीन फीचर्सबद्दलची माहिती सांगणार आहोत.
मालवेअरपासून OTPs लपवणे:
आता, काही विशेष ॲप्स वगळता, इतर कोणत्याही ॲपला तुमच्या सूचनांमध्ये OTP दिसणार नाही. उदाहरणार्थ, स्मार्टवॉच कनेक्ट करणाऱ्या ॲप्सना ही सवलत मिळेल. यामुळे फसव्या ॲप्सना तुमचा OTP चोरणे कठीण होईल.
[read_also content=”WhatsApp वर येतोय नवीन धमाकेदार फिचर, आता सिक्योरिटी होईल डबल https://www.navarashtra.com/technology/new-feature-on-whatsapp-now-security-double-535110.html”]
परमिशन:
Android 13 मध्ये सादर केलेले फीचर्स हे Android 15 मध्ये आणखीन स्ट्रॉंग केली जात आहेत. ज्यामुळे जेव्हा तुम्ही इंटरनेटवरून वेब ब्राउझर, मेसेजिंग ॲप किंवा फाइल मॅनेजर यांसारखे कोणतेही ॲप डाउनलोड कराल तेव्हा तुम्हाला आवश्यक परवानग्या देण्यापूर्वी अधिक काळजीपूर्वक विचार करावा लागेल. प्रत्येक वेळी ही परवानगी देण्यासाठी तुम्हाला एक्स्ट्रा कन्फर्मेशन द्यावे लागेल.
स्क्रीन शेअर करताना सुरक्षा:
अनेक वेळा लोक व्हिडिओ कॉल करतात किंवा त्यांचे मित्र आणि नातेवाईक यांच्यासोबत स्क्रीन शेअर करतात. या काळात काही वेळा लोक त्यांच्या फोनमध्ये पासवर्ड किंवा इतर महत्त्वाची माहिती टाकतात. अशा परिस्थितीत समोरची व्यक्ती तुमची स्क्रीन बघून काही माहिती चोरू शकते, अशी भीती असते. यामुळे यूजर्सचे नुकसान होऊ शकते. यूजर्सच्या सुरक्षेचा विचार करून गुगलने या समस्येवर हा नवीन उपाय शोधला आहे.
आता पासवर्ड अधिक सुरक्षित होईल:
Android 15 मध्ये स्क्रीन शेअर करताना, तुमचा डेटा पूर्वीपेक्षा अधिक सुरक्षित असेल. आता तुम्ही स्क्रीन शेअर कराल तेव्हा तुमच्या सूचना आणि तुम्ही वापरत असलेले ॲप्स (जसे की पासवर्ड टाकणे) समोरच्या व्यक्तीला दिसणार नाहीत. यामुळे तुमचा पर्सनल डेटा सुरक्षित राहील.
ही सुविधा कोणत्या फोनवर उपलब्ध आहे?
सध्या, हे वैशिष्ट्य फक्त Google च्या Pixel फोनवर उपलब्ध आहे, परंतु लवकरच ते इतर Android फोनमध्ये देखील उपलब्ध होईल. याव्यतिरिक्त, तुमची स्क्रीन शेअर करताना, तुम्ही आता तुमची संपूर्ण स्क्रीन शेअर करण्याऐवजी फक्त एका विशिष्ट ॲपची स्क्रीन शेअर करू शकता. यामुळे तुमची उर्वरित माहिती सुरक्षित राहील.