Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 23 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

मुहूर्त ठरला! GTA VI ची लाँच डेट आली समोर… काय असणार खास? जाणून घ्या सविस्तर

GTA VI Launch Date: लवकरच गेमर्सची प्रतिक्षा संपणार आहे. कारण येत्या काही महिन्यांतच बहुप्रतिक्षित गेम GTA 6 लाँच केला जाणार आहे. याबाबत आता कंपनीने अधिकृत घोषणा केली आहे. यंदा गेमर्सना नवीन गोष्टी अनुभवण्याची संधी मिळू शकते.

  • By हर्षदा जाधव
Updated On: May 25, 2026 | 09:34 AM
मुहूर्त ठरला! GTA VI ची लाँच डेट आली समोर... काय असणार खास? जाणून घ्या सविस्तर

मुहूर्त ठरला! GTA VI ची लाँच डेट आली समोर... काय असणार खास? जाणून घ्या सविस्तर

Follow Us
Follow Us:
  • टेक-टू इंटरॅक्टिव्हने GTA 6 ची अधिकृत लाँच तारीख 19 नोव्हेंबर 2026 जाहीर केली आहे.
  • कंपनीला आर्थिक वर्ष 2027 मध्ये GTA 6 मुळे अब्जावधी डॉलर्सची कमाई होण्याची अपेक्षा आहे.
  • GTA 6 साठी लवकरच नवीन ट्रेलर, गेमप्ले व्हिडीओ आणि प्री-ऑर्डरची घोषणा होण्याची शक्यता आहे.
GTA VI Latest Updates: जगातील सर्वात चर्चेत असलेल्या व्हिडीओ गेम्सपैकी एक म्हणजे Grand Theft Auto VI म्हणजेच GTA 6. गेल्या अनेक दिवसांपासून या गेमच्या लाँच डेटबाबत चर्चा सुरु आहे. हा गेम कधी लाँच होणार याबाबत गेमर्समध्ये प्रचंड उत्सुकता आहे. मात्र आता कंपनीने या गेमच्या लाँचिंगची अधिकृत तारीख जाहीर केली आहे. गेम तयार करणारी कंपनी टेक-टू इंटरॅक्टिव्हने अधिकृतपणे पुष्टी करत सांगितलं आहे की, हा बहुचर्चित गेम 19 नोव्हेंबर 2026 रोजी लाँच केला जाणार आहे. कंपनीने केलेल्या या अधिकृत घोषणेनंतर गेमिंग समुदाय आणि गुंतवणूकदारांमध्ये प्रचंड उत्साह निर्माण झाला आहे.

Tech Tips: ‘Restart’ ची सवय अन् स्मार्टफोनचा परफॉर्मंस होईल दमदार! जाणून घ्या गेमचेंजर फायदे

टेक-टूने एका अहवालात म्हटले आहे की, आर्थिक वर्ष 2027 दरम्यान 8 ते 8.2 अब्ज डॉलर्सची निव्वळ कमाई अपेक्षित आहे. असे मानले जाते की या अंदाजाचा सर्वात मोठा भाग GTA 6 च्या विक्री आणि संबंधित महसुलातून येईल. गेल्या काही महिन्यांपासून गेमच्या लाँच डेटबाबत वेगवेगळ्या बातम्या आणि पोस्ट समोर येत होत्या. मात्र आता अखेर कंपनीने केलेल्या अधिकृत घोषणेमुळे सर्व चर्चांना पूर्णविराम लागला आहे. (फोटो सौजन्य – Pinterest)

GTA 6 मध्ये काय असणार खास?

रॉकस्टार गेम्सची GTA सीरीज आधीपासूनच जगातील सर्वात यशस्वी गेम फ्रेंचाइजपैकी एक मानली जाते. यामुळे GTA 6 केवळ एक गेम नाही तर संपूर्ण एंटरटेनमेंट इंडस्ट्रीसाठी सर्वात मोठ्या लाँचपैकी एक मानला जात आहे. तज्ज्ञांचं असं म्हणणं आहे की, गेम रिलीज झाल्यानंतर काही दिवसांतच अब्जावधी डॉलर्सची कमाई करू शकतो. यामुळे केवळ गेमची विक्री होणार नाही तर ऑनलाईन मोड, इन-गेम खरेदी आणि भविष्यात येणाऱ्या अपडेट्समुळे देखील कंपनीला मोठ्या प्रमाणात फायदा होऊ शकतो.

GTA V ने आधीच बनवले रेकॉर्ड

2013 मध्ये लाँच झालेला Grand Theft Auto V आज देखील जगातील सर्वाधिक विकल्या जाणाऱ्या व्हिडीओ गेम्सच्या यादीत समाविष्ट आहे. रिपोर्ट्सनुसार, या व्हिडीओ गेम्सच्या सुमारे 23 करोड प्रती विकल्या गेल्या आहेत. यामुळे आता आगामी GTA 6 कडून अपेक्षा आणखी जास्त वाढल्या आहेत. कंपनीच्या कमाईमधअये GTA Online आणि NBA 2K सारख्या गेम्सचा मोठा वाटा आहे. गेममधील खरेदी आणि ऑनलाइन कंटेंट हे कंपनीसाठी उत्पन्नाचे प्रमुख स्रोत आहेत.

मनगटावरचं असेल स्मार्ट टेक्नॉलॉजीचं पॉवरहाऊस! राउंड डिस्प्लेसह नवे Realme स्मार्टवॉच भारतात दाखल… किंमत 8 हजारांहून कमी

लवकरच सुरु होणार GTA 6 चे मार्केटिंग कँपेन

टेक टूने असे देखील संकेत दिले आहेत की, GTA 6 लवकरच सुरु केले जाणार आहे. त्यामुळे येणाऱ्या महिन्यांत नवीन ट्रेलर, गेमप्ले व्हिडीओ आणि प्री-ऑर्डर संबंधित मोठ्या घोषणा पाहायला मिळू शकतात.

Web Title: Gta vi will launch in the month of november here are the latest updates tech news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 25, 2026 | 09:34 AM

Topics:  

  • online games
  • Tech News
  • tech updates

संबंधित बातम्या

Vivo T5 Pro 5G खरेदी करणाऱ्यांना मोठा झटका! सर्व व्हेरिअंटच्या किंमतीत वाढ, जाणून घ्या नवीन दर
1

Vivo T5 Pro 5G खरेदी करणाऱ्यांना मोठा झटका! सर्व व्हेरिअंटच्या किंमतीत वाढ, जाणून घ्या नवीन दर

Galaxy S25 खरेदी करणं महागलं! Samsung ने 256GB आणि 512GB व्हेरिअंटच्या किंमती वाढवल्या, बेस मॉडेल अजूनही स्वस्तच
2

Galaxy S25 खरेदी करणं महागलं! Samsung ने 256GB आणि 512GB व्हेरिअंटच्या किंमती वाढवल्या, बेस मॉडेल अजूनही स्वस्तच

Nothing यूजर्स, तयार राहा! Nothing OS 5.0 ची लाँच डेट ठरली, कंपनी करणार मोठा धमाका… जाणून घ्या सविस्तर
3

Nothing यूजर्स, तयार राहा! Nothing OS 5.0 ची लाँच डेट ठरली, कंपनी करणार मोठा धमाका… जाणून घ्या सविस्तर

फोन महागतोय अन् नुकसान वाढतंय; ८२ टक्के ग्राहकांचा स्मार्टफोन किमान एकदा पडला
4

फोन महागतोय अन् नुकसान वाढतंय; ८२ टक्के ग्राहकांचा स्मार्टफोन किमान एकदा पडला

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.