फोटो सौजन्य - pinterest
ऑनलाईन पेमेंट की कॅश असा प्रश्न कोणालाही विचारला तर समोरचा व्यक्ती लगेच ऑनलाईन पेमेंट असं उत्तर देतो. कारण कॅश बाळगणे आणि सुट्ट्या पैशांची कटकट यामुळे सध्या सर्वचजण ऑनलाईन पेमेंटचं ऑप्शन निवडतात. शिवाय आपण आपल्या मोबाइलच्या मदतीने ऑनलाईन पेमेंट करतो त्यामुळे ऑनलाईन पेमेंटसाठी कोणतेही वेगळे डिव्हाइस अपल्या सोबत ठेवण्याची गरज नाही. अगदी भाजीवल्यांपासून मोठ्या मॉलपर्यंत सगळीकडे ऑनलाईन पेमेंटची सुविधा दिली जाते.
हेदेखील वाचा- WhatsApp वर आंतरराष्ट्रीय नंबर वरून कॉल येत असेल तर सावध व्हा; नाहीतर ठरला सायबर फ्रॉडचे शिकार
तूम्ही सुद्धा सतत ऑनलाईन पेमेंटचा वापर करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. तुम्ही 4 ऑगस्टला UPI पेमेंटचा वापर करू शकत नाही. हे फक्त HDFC बँक युजर्ससाठी आहे. बँकेने नियोजित डाउनटाइम अलर्ट जारी केला आहे. त्यामुळे 4 ऑगस्टला HDFC बँक युजर्स UPI पेमेंटचा वापर करू शकणार नाहीत. यासाठी वेळ देखील निश्चित करण्यात आली आहे.
हेदेखील वाचा- सरकारी कर्मचाऱ्यांसाठी पाकिस्तानने तयार केला WhatsApp सारखा Beep Pakistan मॅसेजिंग ॲप!
HDFC बँकेने दिलेल्या अलर्टनुसार, 12:00AM ते 03:00 AM पर्यंत सिस्टम देखभालीचं काम केलं जाणार आहे. त्यामुळे या काालावधीत सर्व ऑनलाइन पेमेंट बंद राहतील. हा संपूर्ण वेळ 180 मिनिटांचा असेल. याचा अर्थ HDFC बँक युजर्स सुमारे 3 तास UPI पेमेंटचा वापर करू शकणार नाहीत. याचा परिणाम सर्व बँक युजर्सवर होणार आहे. या कालावधीत सेव्हिंग अकाऊंट युजर्स किंवा करंट अकाऊंट युजर्स दोन्ही ऑनलाईन व्यवहार करू शकणार नाहीत. यामध्ये अनेक थर्ड पार्टी ॲप्सचाही समावेश आहे. Google Pay, WhatsApp Pay, Paytm, Shriram Finance आणि Mobikwik यांचा समावेश आहे. सिस्टम देखभालीच्या कामाचा परिणाम बँकेच्या अधिकृत HDFC मोबाईल बँकिंग ॲपवर देखील होणार आहे, ज्याच्या मदतीने अनेक युजर्स UPI पेमेंट करतात. सिस्टम देखभालीच्या कामाचा परिणाम POS व्यवहारांवर होणार नाही. युजर्स POS च्या मदतीने आपला व्यवहार सुरु ठेऊ शकतात.
बँकेशी संबंधित तांत्रिक त्रुटी आणि अपडेट्समुळे वेळोवेळी सिस्टम मेंटेनन्सचं काम केलं जातं. हे संपूर्ण काम पूर्ण होण्यासाठी सुमारे 3 ते 5 तासांचा कालावधी लागतो. अशा परिस्थितीत बँकांकडून ग्राहकांना आधीच अलर्ट पाठवला जातो. ज्यामध्ये सांगितलं जातं की, बँकेशी संबंधित ॲप्स त्या काळात काम करणार नाहीत किंवा युजर्सना तांत्रिक अडचणींना सामोरं जावं लागू शकतं. याशिवाय व्यवहारातही अडचणी निर्माण होऊ शकतात. असाच अलर्ट HDFC बँक युजर्सना देखील पाठवण्यात आला आहे.
बँकेने दिलेल्या अलर्टनुसार, 4 ऑगस्ट रोजी 12:00AM ते 03:00 AM पर्यंत सिस्टम देखभालीचं काम केलं जाणार आहे. त्यामुळे या काालावधीत सर्व ऑनलाइन पेमेंट बंद राहणार आहेत. या कालावधीत सेव्हिंग अकाऊंट युजर्स किंवा करंट अकाऊंट युजर्स दोन्ही ऑनलाईन व्यवहार करू शकणार नाहीत. सिस्टम देखभालीच्या कामाचा परिणाम बँकेच्या अधिकृत HDFC मोबाईल बँकिंग ॲपवर देखील होणार आहे, ज्याच्या मदतीने अनेक युजर्स UPI पेमेंट करतात.