Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 19 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • Navbharat Conclave
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

7,500mAh बॅटरी आणि MediaTek प्रोसेसर… नव्या Honor स्मार्टफोनचा मार्केटमध्ये जलवा! किंमत पाहून तुम्हीही व्हाल खुश

Honor X7e Launched: 22 हजार रुपयांच्या बजेटमध्ये नवीन स्मार्टफोन शोधताय? असा स्मार्टफोन जो प्रिमियम फीचर्सने सुसज्ज असेल. तर हॉनरचा नवीन स्मार्टफोन नक्कीच तुमच्यासाठी खास असणार आहे. या स्मार्टफोनमध्ये बजेट फ्रेंडली किंमतीत अनेक तगडे फीचर्स देण्यात आले आहेत.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Jun 03, 2026 | 11:25 AM
7,500mAh बॅटरी आणि MediaTek प्रोसेसर... नव्या Honor स्मार्टफोनचा मार्केटमध्ये जलवा! किंमत पाहून तुम्हीही व्हाल खुश

7,500mAh बॅटरी आणि MediaTek प्रोसेसर... नव्या Honor स्मार्टफोनचा मार्केटमध्ये जलवा! किंमत पाहून तुम्हीही व्हाल खुश

Follow Us
Follow Us:
  • हॉनर एक्स 7 ई स्मार्टफोन सुमारे 22 हजार रुपयांच्या किंमतीत 6GB रॅम आणि 256GB स्टोरेजसह लाँच करण्यात आला आहे.
  • या फोनमध्ये 120Hz रिफ्रेश रेटसह 6.61-इंच एचडी+ टीएफटी एलसीडी डिस्प्ले आणि मीडियाटेक हेलिओ जी 81 अल्ट्रा प्रोसेसर देण्यात आला आहे.
  • हॉनर एक्स 7 ई मध्ये 50MP कॅमेरा, 7000mAh पेक्षा मोठी बॅटरी आणि 45W फास्ट चार्जिंगचा सपोर्ट मिळतो.
Honor Smartphone Launched: टेक कंपनी हॉनरने एंट्री-लेवल स्मार्टफोन लाइनअपअंतर्गत त्यांचा आणखी एक नवीन स्मार्टफोन लाँच केला आहे. कंपनीचा हा नवीन स्मार्टफोन Honor X7e या नावाने लाँच करण्यात आला आहे. ज्या यूजर्सना प्रिमियम सेगमेंटमधील स्मार्टफोन खरेदी न करता देखील मोठी बॅटरी, तगडे सॉफ्टवेअर आणि रोजच्या आयुष्यात उपयोगी ठरणारे फीचर्स पाहिजे आहेत, अशा यूजर्सना टार्गेट करण्यासाठी कंपनीने त्यांचा नवीन स्मार्टफोन डिझाईन केला आहे. कंपनीने लाँच केलेल्या या नवीन स्मार्टफोनची किंमत 25 हजार रुपयांहून कमी आहे. त्यामुळे यूजर्सना अत्यंत कमी किंमतीत दमदार फीचर्सचा अनुभव घेण्याची संधी मिळणार आहे.

WhatsApp Update: स्कॅमर्सची आता खैर नाही! प्रायव्हसी अबाधित ठेवत व्हॉट्सअ‍ॅप रोखणार सायबर फसवणूक… नव्या फीचरची चाचणी सुरु

Honor X7e ची किंमत आणि उपलब्धता

नुकत्याच लाँच करण्यात आलेल्या या नव्या स्मार्टफोनची किंमत मलेशियामध्ये MYR 899 म्हणजेच सुमारे 22 हजार रुपये ठेवण्यात आली आहे. स्मार्टफोनची ही किंमत 6GB रॅम आणि 256GB स्टोरेज व्हेरिअंटसाठी आहे. सनराईज ऑरेंज आणि मिडनाईट ब्लॅक या दोन रंगांच्या पर्यायांमध्ये ग्राहक हा स्मार्टफोन खरेदी करू शकतात. (फोटो सौजन्य – Honor)

Honor X7e चे स्पेसिफिकेशन्स आणि फीचर्स

डिस्प्ले

नव्या डिव्हाईसच्या फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्सबद्दल बोलायचं झालं तर, Honor X7e मध्ये 6.61-इंच टीएफटी एलसीडी डिस्प्ले देण्यात आला आहे. जो 1604 x 720 पिक्सेलचे एचडी+ रिजाल्यूशन ऑफर करतो. हा स्मार्टफोन 120Hz पर्यंत रिफ्रेश रेटला सपोर्ट करतो आणि यामध्ये डायनामिक डिमिंग सारखे आई कम्फर्ट फीचर्स देखील पाहायला मिळत आहेत.

प्रोसेसर

लेटेस्ट लाँच स्मार्टफोनमध्ये मीडियाटेक हेलियो जी81 अल्ट्रा चिपसेट देण्यात आला आहे. डिव्हाईसमध्ये 6GB रॅम आणि 256GB इंटरनल स्टोरेज देण्यात आले आहे. Honor रॅम एक्सपेंशन टेक्नोलॉजी देखील ऑफर करत आहे. ज्यामुळे गरज पडल्यास यूजर्स एक्स्ट्रा वर्चुअल मेमोरीचा वापर करू शकतात.

कॅमेरा

फोटोग्राफीसाठी या स्मार्टफोनमध्ये 50-मेगापिक्सेलचा प्रायमरी कॅमेरा दिला आहे. यासोबतच फोनमध्ये एक ऑक्सिलरी सेंसर देखील मिळणार आहे. सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी या स्मार्टफोनच्या समोरील बाजूला 5-मेगापिक्सेलचा कॅमेरा दिला आहे.

बॅटरी

या स्मार्टफोनची सर्वात मोठी खासियत म्हणजेच याची बॅटरी आहे. यामध्ये 7,000mAh किंवा 7,500mAh मिळणार आहे. तसेच या डिव्हाईसमध्ये 45W वायर्ड फास्ट चार्जिंग सपोर्ट देखील देण्यात आला आहे.

स्मार्टफोन ग्राहकांना मोठा झटका! Poco चे तीन स्वस्त 5G डिव्हाईस झाले महाग! तब्बल इतकी वाढली किंमत

कनेक्टिविटी पर्याय

नव्या फोनमध्ये अँड्रॉईड 16 वर आधारित मॅजिकओएस 10.0 मिळणार आहे. फोनमध्ये साइड-माउंटेड फिंगरप्रिंट स्कॅनर, फेस अनलॉक आणि धूळ आणि पाण्यापासून सुरक्षेसाठी IP64-रेटिंग दिली आहे. डिव्हाईसमध्ये ब्लूटूथ 5.1, यूएसबी टाइप-सी पोर्ट, 3.5mm हेडफोन जॅक मिळणार आहे. सर्वात महत्त्वाची गोष्ट अशी आहे की, या डिव्हाईसमध्ये 5G कनेक्टिविटी सपोर्ट मिळणार नाही.

💡

Frequently Asked Questions

  • Que: HONOR कोणत्या देशाची कंपनी आहे?

    Ans: HONOR ही चीनची स्मार्टफोन आणि ग्राहक इलेक्ट्रॉनिक्स कंपनी आहे.

  • Que: HONOR चे स्मार्टफोन चांगले असतात का?

    Ans: होय, HONOR स्मार्टफोन आकर्षक डिझाइन, चांगला कॅमेरा आणि दमदार परफॉर्मन्ससाठी ओळखले जातात.

  • Que: HONOR चे 5G स्मार्टफोन उपलब्ध आहेत का?

    Ans: होय, HONOR कडे विविध किंमत श्रेणींमध्ये अनेक 5G स्मार्टफोन उपलब्ध आहेत.

Web Title: Honor x7e launched with 7500mah battery and mediatek processor read about price

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 03, 2026 | 11:25 AM

Topics:  

  • smartphone
  • tech launch
  • Tech News

संबंधित बातम्या

Apple यूजर्सना मोठा झटका! म्युझिक आणि ॲपल वन सबस्क्रिप्शन महागले; जाणून घ्या नवीन किंमत
1

Apple यूजर्सना मोठा झटका! म्युझिक आणि ॲपल वन सबस्क्रिप्शन महागले; जाणून घ्या नवीन किंमत

Facebook Down: देशभरात फेसबुक ठप्प! लाखो युजर्सना लॉगइन करण्यात अडचण; काय आहे यामागील कारण?
2

Facebook Down: देशभरात फेसबुक ठप्प! लाखो युजर्सना लॉगइन करण्यात अडचण; काय आहे यामागील कारण?

भारताने रचला इतिहास! देशातील पहिल्या खासगी ऑर्बिटल रॉकेट ‘विक्रम-1’ चे यशस्वी प्रक्षेपण; अंतराळ क्षेत्रात नवे पर्व सुरू
3

भारताने रचला इतिहास! देशातील पहिल्या खासगी ऑर्बिटल रॉकेट ‘विक्रम-1’ चे यशस्वी प्रक्षेपण; अंतराळ क्षेत्रात नवे पर्व सुरू

अखेर घोषणा झालीच! OnePlus ने बंद केले OxygenOS; अमेरिका आणि युरोपमधून गुंडाळला कारभार, यूजर्सवर काय होणार परिणाम?
4

अखेर घोषणा झालीच! OnePlus ने बंद केले OxygenOS; अमेरिका आणि युरोपमधून गुंडाळला कारभार, यूजर्सवर काय होणार परिणाम?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.