WhatsApp Update: स्कॅमर्सची आता खैर नाही! प्रायव्हसी अबाधित ठेवत व्हॉट्सअॅप रोखणार सायबर फसवणूक... नव्या फीचरची चाचणी सुरु
WABetaInfo ने जारी केलेल्या एका रिपोर्टनुसार, व्हॉट्सअॅप सर्वकाही फोनवर मॅनेज करणार आहे, ज्यामुळे यूजर्सच्या प्रायव्हसीला धक्का लागणार नाही. आतापर्यंत मिळालेल्या माहितीवरून असा अंदाज लावला जाऊ शकतो की, आगामी फीचर फार रंजक असणार आहे. कंपनी सध्या या फीचरची चाचणी करत असून अद्याप हे फीचर बीटा यूजर्ससाठी देखील रोलआऊट करण्यात आले नाही. (फोटो सौजन्य – Pinterest)
व्हॉट्सअॅपवर गेल्या काही काळापासून ऑनलाईन स्कॅम आणि फसवणूकीच्या घटना मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत. स्कॅमर्स लोकांना अनोळखी नंबरवरून मेसेज पाठवतात. अनेकदा स्कॅमर्स भासवतात की ते पोलीस किंवा सरकारी अधिकारी आहेत, ज्यामुळे लोकांचा त्यांच्यावर विश्वास बसतो. तर काही घटनांमध्ये स्कॅमर्स लोकांच्या खोट्या लिंक पाठवतात, ज्यावर क्लिक करताच यूजर्सचं संपूर्ण बँक अकाऊंट रिकामं होतं. याच सर्वांचा विचार करून आणि यूजर्सच्या सुरक्षेचा विचार करून आता व्हॉट्सअॅप एका नव्या फीचरवर काम करत आहे. कंपनीचे हे नवीन फीचर स्कॅम अलर्ट नावाने जारी केले जाऊ शकते. या फीचरअंतर्गत जर कोणताही संशयास्पद मेसेज आला तर यूजरला त्वरित अलर्ट केले जाणार आहे.
नवीन फीचर अनोळखी आणि संशयास्पद नंबर आपोआप ब्लॉक करण्याऐवजी यूजरला माहिती देणार आहे. ज्यामुळे यूजर्स स्वत: निर्णय घेऊ शकणार आहेत. यूजर्स ठरवू शकणार आहेत की, त्यांना संशयास्पद नंबर विरोधात कोणती कारवाई करायची आहे की, संभाषण पुढे सुरु ठेवायचं आहे.
फोनमध्ये जेव्हा तुम्ही स्कॅम अलर्ट फीचर इनेबल कराल, तेव्हा अॅप अनोळखी नंबरवरून येणारे मेसेज थेट डिव्हाईसवर रिव्ह्यु करणार आहे. तर सिस्टिमला असे संकेत मिळाले की, कोणता मेसेज फ्रॉड आहे तर चॅट्समध्ये एक वॉर्निंग बॅनर दिसेल. या अलर्ट बॅनरमध्ये ‘This may be a scam’ (हा स्कॅम असू शकतो) असा मेसेज दिसण्याची शक्यता आहे. यानंतर यूजरकडे पर्याय असेल की तो संबंधित नंबर ब्लॉक आणि रिपोर्ट करू शकतो किंवा त्यावर विश्वास ठेऊन संभाषण सुरु ठेऊ शकतो.
नेटवर्क गेलं तरी कॉल थांबणार नाही! BSNL यूजर्स आत्ताच ऑन करा फोनमधील ही सेटिंग… फॉलो करा या स्टेप्स
व्हॉट्सअॅपचं असं म्हणणं आहे की, हे फीचर पूर्णपणे ऑन डिव्हाईस काम करण्यासाठी डिझाईन करण्यात आले आहे. ज्यामुळे विश्लेषणासाठी व्हॉट्सॲप किंवा मेटावर मेसेज पाठवण्याची गरज भासणार नाही. तसेच कंपनी लोकल ट्रांसपेरेंसी रिपोर्ट्सवर देखील काम करत आहे. हे फीचर्स लवकरच यूजर्सना अनुभवता येणार आहेत.
Ans: Meta Platforms या कंपनीच्या मालकीचे व्हॉट्सॲप आहे.
Ans: होय, व्हॉट्सॲप वापरण्यासाठी मोबाईल डेटा किंवा Wi-Fi इंटरनेट कनेक्शन आवश्यक असते.
Ans: होय, व्हॉट्सॲप द्वारे वैयक्तिक तसेच ग्रुप व्हिडिओ कॉल करता येतात.






