File Photo : aadhar card
सरकारद्वारे जारी करण्यात आलेलं आधार कार्ड प्रत्येक भारतीयासाठी महत्त्वाचा पुरावा आहे. भारत सरकारने सुरु केलेल्या कोणत्याही योजनेचा लाभ घेण्यासाठी तुमच्याकडे आधार कार्ड असणं आवश्यक आहे. आधार कार्ड भारतीय नागरिकत्वाचा पुरावा मानला जातो. आधार कार्ड असण्यासोबतच ते वेळोवेळी अपडेट करणं देखील तितकच महत्त्वाचं आहे. तुमच्या आधार कार्डवरील सर्व माहिती योग्य असणे गरजेचं आहे.
टेकसंबंधित बातम्या वाचण्यासाठी इथे क्लिक करा
आधार कार्ड बनवण्याची योग्य प्रक्रिया काय आहे हे अनेकांना माहिती नाही. आधार कार्डसाठी ऑनलाइन अप्लाय करता येईल का? याबद्दल आम्ही तुम्हाला येथे सांगणार आहोत. अनेकजण आजही आधार कार्ड बनवण्यासाठी आधाक केंद्राबाहेर जाऊन तासंतास रांगेत उभं राहतात. यामुळे बराच वेळा वाया जातो. तसेच तुमची इतर कामं देखील अडतात. यावरील एक सोपा मार्ग म्हणजे तुम्ही आधार कार्डसाठी ऑनलाईन अप्लाय करू शकता. (फोटो सौजन्य – pinterest)
आधार कार्ड बनवण्याचे ऑफलाइन आणि ऑनलाइन दोन्ही मार्ग आहेत. तुम्ही आधार कार्डसाठी ऑनलाइन अर्ज केला तरीही तुम्हाला नावनोंदणी केंद्रावर जावे लागेल. परंतु ऑनलाइन अपॉइंटमेंट घेतल्याने अडचणी कमी होतात आणि तुम्हाला नावनोंदणीसाठी जाण्याची गरज नाही. तसेच ऑनलाइन अपॉइंटमेंटमुळे केंद्रात जाऊन प्रतीक्षा करण्याची गरज नाही. ऑनलाइन अपॉइंटमेंटमुळे अगदी काही वेळातच तुमचं काम होतं. पण तुम्ही ऑनलाइन अपॉइंटमेंट न घेता नावनोंदणी केंद्रावर आधार कार्ड बनवण्यासाठी गेलात तर तुम्हाला बराच वेळ वाट पाहावी लागेल.
आधार कार्ड बनवण्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला आवश्यक कागदपत्रांसह नावनोंदणी केंद्रावर जावे लागेल. इथे तुम्हाला तुमची आवश्यक कागदपत्र दाखवावी लागतील. यूआयडीएआयच्या साइटद्वारे तुम्ही अधिकृत नोंदणी केंद्रांबद्दल माहिती घेऊ शकता.
टेकसंबंधित बातम्या वाचण्यासाठी इथे क्लिक करा
तुमची नावनोंदणी प्रक्रिया पूर्ण झाल्यावर आधार क्रमांक तयार होईल. आधारसाठी अर्ज करताना, एक वर्चुअल क्रमांक दिला जातो, ज्याद्वारे आधार अर्जाचा मागोवा घेणं अगदी सहज शक्य होतं. आधार कार्ड बनवण्यासाठी किमान 30 दिवस लागतात, जे जास्तीत जास्त 180 दिवसांपर्यंत जातात.
UIDAI ने आधार कार्ड अपडेटबाबत कडक नियम केले आहेत. पहिल्यांदा आधारसाठी अर्ज करताना काही चुका झाल्या तर त्या सुधारण्याची संधी आहे. आधार कार्डमध्ये जन्मतारिख आणि लिंग एकदाच अपडेट केले जाऊ शकतात. पत्ता बदलण्याबाबत कोणताही नियम नाही. तर दोनदा नाव सुधारण्याची संधी आहे.