Apple AirTag 2: 2025 मध्ये लाँच होणार अॅपल AirTag 2, काय असतील खास फीचर्स? जाणून घ्या
टेक जायटं कंपनी अॅपलने 2021 मध्ये AirTag लाँच केलं होतं. हे ब्लूटूथ डिव्हाइस तुम्हाला तुमच्या हरवलेल्या वस्तू शोधण्यासाठी मदत करते. AirTag या यशानंतर आता कंपनी लवकरच AirTag 2 लाँच करणार असल्याची माहिती समोर आली आहे. 2024 मध्ये AirTag 2 लाँच केलं जाऊ शकते. कंपनी पुढील वर्षी iPhone SE 4, नवीन iPad व्हेरियंट आणि अपडेट मॅक मॉडेल्स देखील लाँच करण्याच्या तयारीत आहे.
टेकसंबंधित बातम्या वाचण्यासाठी इथे क्लिक करा
ब्लूमबर्गच्या मार्क गुरमनच्या अहवालानुसार, अॅपल पुढील वर्षाच्या मध्यभागी AirTag 2 रिलीझ करू शकते. यासाठी कंपनीने काही चाचण्या देखील सुरु केल्या आहेत. AirTag 2 चे डिझाईन पूर्वीप्रमाणे असण्याची अपेक्षा केली जात आहे. मात्र त्याच्या फीचर्समध्ये बरीच सुधारणा केली जाऊ शकते. (फोटो सौजन्य – pinterest)
B389 या सांकेतिक नावाने 2021 च्या सुरुवातीला पहिला AirTag लाँच करण्यात आला. या डिव्हाईसला युजर्सचा प्रचंड प्रतिसाद मिळाला. या वर्षी नवीन AirTag मॉडेल येऊ शकते अशी माहिती समोर आली आहे. अॅपल संबंधित बातम्यांचा अहवाल देण्याचा मजबूत ट्रॅक रेकॉर्ड असलेले गुरमन यांनी सांगितलं की AirTag 2 (मॉडेल क्रमांक B589) च्या चाचण्या सुरु झाल्या आहेत. कंपनीचं हे नवीन डिव्हाईस 2025 मध्ये बाजारात दाखल होऊ शकते.
अॅपल AirTag 2 च्या फीचर्समध्ये प्रचंड सुधारणा करत आहे. यासाठी ऑनबोर्ड वायरलेस चिप अपग्रेड करत आहे आणि प्रायव्हसी संबंधित सुधारणा करत आहे. क्युपर्टिनो-आधारित टेक जायंट कंपनी एअरटॅगमधून स्पीकर काढून टाकण्याचा विचार करत आहे. गुरमन यांनी सांगितलं की अॅपल Google Nest Hub आणि Amazon Echo Hub सारखे स्मार्ट होम कमांड सेंटर लाच करण्याची योजना आखत आहे, जे पुढील वर्षी AirTag 2 सोबत रिलीज केले जाऊ शकते. दरम्यान, कंपनी पुढील वर्षी iPhone SE 4, नवीन iPad व्हेरियंट आणि अपडेट मॅक मॉडेल्स देखील लाँच करण्याच्या तयारीत आहे.
अॅपलसंबंधित बातम्या वाचण्यासाठी इथे क्लिक करा
अॅपल या हार्डवेअर लाँचसाठी तयारी करत असताना, ते iPhones मध्ये Find My कार्यक्षमता देखील वाढवत आहे. गेल्या आठवड्यात, अॅपलने iOS 18.2 बीटा 2 सह एक नवीन Find My फीचर जारी केले, जे वापरकर्त्यांना त्यांच्या हरवलेल्या वस्तूंचे लोकेशन शेअर करण्यास अनुमती देते.
2021 च्या सुरुवातीला पहिला AirTag लाँच करण्यात आला. अॅपल Air Tag ची किंमत 3,490 रुपये आहे. अॅपल AirTag वस्तू शोधण्यासाठी अॅपलचे Find My नेटवर्क वापरते. AirTag IP67 पाणी प्रतिरोधक आहे. अॅपल AirTag फक्त ॲपल फोनमध्ये वापरला जाऊ शकतो. अॅपल AirTag ॲक्सेसरीजसाठी ब्लूटूथ ट्रॅकर आहे. हे एका लहान आकाराच्या वर्तुळाकार डिझाइनसह येते. अॅपलने प्रत्येक AirTag वर एक U1 चिप जोडली आहे.