(फोटो सौजन्य: Pinterest)
पीएफ म्हणजेच प्रोविडेंट फंड ही नोकरदार लोकांसाठी महत्त्वाची रक्कम आहे. दर महिन्याला नोकरदार लोकांच्या पगारातून ठराविक रक्कम रजा होऊन पीएफमध्ये जमा केली जाते. ही रक्कम कंपनीतर्फेच जमा केली जाते. अशात अनेकदा आपला पीएफ जमा तर होत असतो मात्र जमा होऊन आता त्याची रक्कम किती झाली आहे हे अनेकांना ठाऊक पडत नाही. पीएफ ही एकप्रकारची आपली सेव्हिंगच आहे जिला आपण कधीही बाहेर काढून गरजेच्या वेळी त्याचा वापर करू शकतो.
अनेकांना हे ठाऊक नाही पण तुम्ही ऑनलाइन पद्धतीने आपला पीएफ बॅलेन्स चेक करू शकता. अनेक लोक ऑनलाइन पीएफ बॅलेन्स चेक करताना गोंधळून जातात. अशात आम्ही तुम्हाला सांगतो की, तुम्ही हे वेबसाइट किंवा ॲपद्वारे चेक करू शकता. एवढेच नाही तर पीएफमध्ये असलेली रक्कम एसएमएस आणि मिस्ड कॉलद्वारे देखील कळू शकते. सरकारने EPFO ॲप आणि उमंग ॲप देखील तयार केले आहे, जे घरी बसलेल्या लोकांना त्यांच्या पीएफ अकाऊंटमध्ये किती रक्कम जमा आहे हे जाणून घेण्यास मदत करते. चला याची संपूर्ण प्रक्रिया जाणून घेऊया.
दोन पद्धतींनी चेक करू शकता PF Balance चेक?
पीएफ बॅलन्स साधारणपणे दोन प्रकारे तपासले जाऊ शकते. हे काम UAN नंबरसह (Universal Account Number) किंवा त्याशिवाय चेक करता येते. जर तुम्हाला UAN नंबरच्या मदतीने पीएफ शिल्लक तपासायची असेल तर तुम्हाला ईपीएफ पोर्टलवर जावे लागेल किंवा हे काम उमंग ॲपच्या मदतीने केले जाऊ शकते. तुम्हाला UAN नंबर आठवत नसेल तर, तुम्ही तुमच्या मोबाइलवरून एसएमएस किंवा मिस्ड कॉलद्वारे पीएफ बॅलन्स तपासू शकता. यासाठी 7738299899 या क्रमांकावर एसएमएस सुविधा उपलब्ध आहे. तसेच 9966044425 या क्रमांकावर मिस्ड कॉलची सुविधा उपलब्ध आहे. तुमच्या पीएफ अकाऊंटशी लिंक असलेल्या नंबरवरूनच तुम्हाला मिस्ड कॉल किंवा एसएमएस पाठवण्याचे आहे, हे लक्षात ठेवा.
UAN नंबरने कसे करू शकता ऑनलाइन PF चेक?
या गोष्टी ध्यानात असूद्यात?
जेव्हा तुमचा UAN ॲक्टिव्ह होईल आणि जेव्हा तुम्ही वेबसाइटवर रजिस्टर्ड करता तेव्हाच तुम्ही EPFO वेबसाइटवर तुमची PF बॅलन्स चेक करू शकता. जर तुम्हाला तुमचे पासबुक पहायचे असेल तर ते नोंदणीनंतर 6 तासांनंतर दिसेल. ज्या कंपन्यांचा पीएफ ट्रस्ट अंतर्गत येतो ते EPFO पोर्टलवर त्यांचा बॅलन्स चेक करू शकत नाहीत.
YouTube ला मिळालं मोठं अपडेट, Netflix आणि Prime Video सारखा दिसणार आता व्हिडीओ स्ट्रिमिंग प्लेटफॉर्म
UMANG ॲपवरूनही करता येईल PF चेक