फोटो सौजन्य- pinterest
धनत्रयोदशीला गुरु ग्रह आपल्या राशीमध्ये बदल करणार आहे. 18 ऑक्टोबर रोजी गुरु ग्रह कर्क राशीमध्ये आपले संक्रमण करणार आहे. ज्योतिषशास्त्रात गुरु ग्रहाला शुभ ग्रह मानला जातो. हा ग्रह ज्यावेळी कर्क राशीमध्ये प्रवेश करतो हे संक्रमण ज्योतिषशास्त्रात शुभ मानले जाते. कारण घर, कुटुंब, भावना, सुरक्षितता आणि मातृत्वाचा स्वामी असलेला हा ग्रह कर्क राशीत प्रवेश करणार आहे. गुरु ग्रहाच्या या घटनेचा परिणाम सर्व राशीच्या लोकांवर होताना दिसेल. हा ग्रह 5 डिसेंबर रोजी दुपारी 3.38 वाजेपर्यंत गुरु कर्क राशीत राहणार आहे. या संक्रमणाचा काही राशीच्या लोकांना खूप फायदा होणार आहे. कर्क राशीमध्ये गुरु ग्रहाचे होणारे संक्रमण कोणत्या राशीच्या लोकांसाठी फायदेशीर राहणार आहे, ते जाणून घ्या
धनत्रयोदशीला मेष राशीच्या लोकांच्या कुंडलीमध्ये गुरु ग्रहाचे संक्रमण बाराव्या घरात होत आहे. हे संक्रमण आध्यात्मिक प्रगती, परदेश प्रवास, मानसिक शांती आणि गूढ ज्ञानाकडे प्रेरित करेल. या काळात तुमच्या खर्चामध्ये देखील वाढ होऊ शकते. त्यासोबतच मानसिक विकासासाठी आणि आध्यात्मिक फायदेशीर राहील. तसेच मानसिक ताण कमी होईल. आध्यात्मामध्ये तुमचा रस वाढेल.
गुरुचे संक्रमण वृषभ राशीच्या अकराव्या घरात होत आहे. या काळात तुमची स्वप्ने, आकांक्षा आणि सामाजिक संबंध दृढ होतील. तुम्हाला मित्रांकडून पाठिंबा आणि नवीन संधी मिळतील. उत्पन्नाचे स्रोत वाढतील आणि सामाजिक प्रतिष्ठा वाढेल. आर्थिक लाभ देखील होऊ शकतो.
मिथुन राशीच्या दहाव्या घरात गुरु ग्रह संक्रमण करत आहे. ज्याचा संबंध करिअर आणि पदोन्नतीशी संबंधित आहे. हे संक्रमण तुम्हाला नवीन करिअर संधी, पदोन्नती आणि प्रतिष्ठा मिळवून देऊ शकते. यावेळी तुम्ही घेतलेल्या मेहनतीचा तुम्हाला अपेक्षित यश मिळू शकते.
गुरु ग्रहाचे कर्क राशीमध्ये होणारे संक्रमण खूप शुभ असणार आहे. या काळामध्ये तुमच्यामधील आत्मविश्वास वाढलेला राहील. नवीन संधी उपलब्ध होतील आणि तुमच्या जीवनात महत्त्वाचे बदल अनुभवायला मिळतील. तसेच तुमचे आरोग्य चांगले राहील. कुटुंबामध्ये आनंदाचे वातावरण राहील.
सिंह राशीमध्ये गुरु ग्रहाचे संक्रमण नवव्या घरात होत आहे. या काळात धार्मिक कार्ये, उच्च शिक्षण, प्रवास आणि भाग्य वाढेल. तसेच आध्यात्माची आवड देखील वाढेल. हा काळ परदेश प्रवास किंवा उच्च शिक्षणासाठी अनुकूल आहे.
गुरु ग्रहाचे संक्रमण तूळ राशीच्या सातव्या घरात होत आहे. हे संक्रमण तुमचे वैवाहिक जीवन, भागीदारी आणि व्यावसायिक संबंध मजबूत करेल. तुमच्या जोडीदारासोबतचे तुमचे संबंध सुधारतील आणि नवीन भागीदारींच्या संधी निर्माण होतील.
गुरु ग्रहाचे संक्रमण धनु राशीच्या पाचव्या घरात होणार आहे. ज्याचा संबंध मुलांशी, शिक्षणाशी, सर्जनशीलतेशी आणि प्रेमाशी संबंधित आहे. या काळात विद्यार्थ्यांना चांगले परिणाम होतील. वैवाहिक जीवन चांगले राहील.
गुरु ग्रहाचे संक्रमण मकर राशीच्या चौथ्या घरामध्ये होणार आहे. कौटुंबिक जीवन चांगले राहील. तुमच्या आईशी असलेले तुमचे संबंध सुधारतील. या काळात तुम्ही वाहनांची खरेदी करु शकता. कुटुंबामध्ये शांतीचे वातावरण राहील.
गुरु ग्रहाचे कुंभ राशीमध्ये तिसऱ्या घरात संक्रमण होणार आहे. तुम्हाला तुमच्या भावंडांकडून सहकार्य मिळेल आणि संवाद सुधारेल. लहान प्रवास यशस्वी होतील. संवाद आणि लेखनात प्रगती होईल. तुम्हाला नवीन कल्पना आणि ज्ञान मिळेल.
मीन राशीमध्ये गुरु ग्रहाचे संक्रमण दुसऱ्या घरात होत आहे. ज्याचा संबंध धन, वाणी आणि कुटुंबाशी संबंधित आहे. या काळात आर्थिक लाभ होऊ शकतो. कौटुंबिक संवाद वाढतील. या काळात तुमच्या बोलण्यावर संयम ठेवा.
(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)