Vivo स्मार्टफोन होणार अजून स्टायलिश! OriginOS 6 अखेर लाँच, AI फीचर्ससह मिळणार Apple वाला लुक, तुमच्या फोनला कधी मिळणार नवा अपडेट?
Vivo ने अँड्राईड 16 ऑपरेटिंग सिस्टमवर आधारित OriginOS 6 अखेर आता लाँच केला आहे. कंपनीने काही दिवसांपूर्वीच पुष्टी केली होती की, iQOO आणि Vivo स्मार्टफोनसाठी हे सॉफ्टवेयर अपडेट रिलीज करणार आहे. या घोषणेनंतर आता कंपनीने काही डिव्हाईससाठी लेटेस्ट ऑपरेटिंग सिस्टम अपडेट रिलीज केले आहे. आता आम्ही तुम्हाला सांगणार आहोत की, कंपनी लेटेस्ट सॉफ्टवेयर अपडेट कोणत्या स्मार्टफोनसाठी आणि कधी रिलीज करणार आहे.
Samsung Galaxy M17 5G: Samsung चा नवा जलवा! दमदार कॅमेरा आणि पॉवरफुल बॅटरीने केला धडाका
या सॉफ्टवेयर अपडेटमध्ये कंपनीने होम पेज, लॉक स्क्रीन, ऐप आणि इतर अनेक बदल केले आहेत. यूजर्स होम स्क्रीन विजेट कस्टमाइजेशनसाठी अनेक ऑप्शन मिळणार आहे. यासोबतच विवोने एपलच्या लिक्विड ग्लास डिझाईनने प्रेरित यूआई दिला आहे. ओरिजनओएसमध्ये विजेट आधीपासूनच जास्त कर्व आहे. यासोबतच अॅप्स आयकॉन सर्कुलर देण्यात आले आहे. कंपनीने यामध्ये अधिक चांगले कम्प्यूटिंग, डुअल रेंडरिंग आर्किटेक्चर, स्मूद एनिमेशनसाठी Blue River Smooth Engine चा सपोर्ट देण्यात आला आहे. त्याच्या मदतीने, अॅप्समध्ये स्विच करणे पूर्वीपेक्षा खूप सोपे आहे. OriginOS 6 अपडेटमध्ये कंपनीचे लक्ष AI आधारित फीचर्सवर होते. AI टूल्समध्ये AI फोन असिस्टंट, AI समरी, AI फोटो एलिमेंट्स, सर्कल टू सर्च इत्यादी फीचर्सचा समावेश आहे. विवोने AI इमेज एडिटिंग टूल देखील अपग्रेड केले आहे.(फोटो सौजन्य – Pinterest)
OriginOS 6 अपडेट 15 ऑक्टोबर रोजी ग्लोबली लाँच केले जाणार आहे. कंपनीने सध्या OriginOS 6 ओपन बीटा लाँच केला आहे. येथे, आम्ही Vivo आणि iQOO स्मार्टफोन्सची यादी शेअर करत आहोत ज्यांना हे अपडेट मिळेल.