(फोटो सौजन्य: istock)
विचार करा तुम्हाला इमर्जन्सीमध्ये कॉल करायचा आहे पण, अचानक तुमच्या लक्षात येते की तुमच्या स्मार्टफोनची बॅटरी 1% आहे. तुम्ही लगेच जाता आणि आपला मोबाईल चार्जिंगला लावता. मात्र खूप वेळ चार्जिंगला फोन लावूनही तुमचा चार्ज होत नाही. अशावेळी चिंता आणि राग दोन्ही येणं स्वाभाविक आहे. ही एक चिंतेची बाब आहे कारण यामुळे आपली अनेक कामे खोळंबली जाऊ शकतात.
अनेकदा गरजेच्या वेळी आपल्या स्मार्टफोनमध्ये चार्जिंगची समस्या उद्भवते, ज्यामुळे आपण अस्वस्थ होतो. चार्जिंग समस्या केवळ निराशाजनक नसतात, परंतु जेव्हा तुम्ही तुमच्या डिव्हाइसवर सर्वाधिक अवलंबून असता तेव्हा आणीबाणीच्या परिस्थितीत त्या आणखी समस्याप्रधान असू शकतात. चांगली गोष्ट अशी आहे की चार्जिंगच्या बहुतेक समस्या काही सोप्या ट्रीक्सने सोडवल्या जाऊ शकतात. येथे आम्ही काही सोप्या टिप्स शेअर करणार आहोत. हे तुमच्या स्मार्टफोनच्या चार्जिंगच्या समस्यांचे निराकरण करण्यात मदत करतील. चला तर मग याविषयी विस्तारपूर्वक जाणून घेऊया.
YouTube Trick: दिवसभर व्हिडिओ पाहिलात तरीही संपणार नाही डेटा; ही स्मार्ट ट्रिक माहितीये का?
बॅग्राऊंड ॲप्स बंद करा
आपल्या फोनमध्ये अनेक ॲप्स बॅकग्राउंडमध्ये चालू राहतात, ज्यामुळे आपल्या फोनची बॅटरी विनाकारण युज होत असते. हे बॅटरी संपण्याचे हे सर्वात सामान्य कारण आहे. यामुळे चार्जर कनेक्ट असूनही डिव्हाइस चार्ज होत नाही. त्यामुळे फोनवर बॅकग्राउंडमध्ये चालू असलेले ॲप्स बंद करा आणि त्यानंतर चार्जिंग सुरू करा.
फोन रिस्टार्ट करून पहा
तुमचा स्मार्टफोन चार्ज होत नसेल तर घाबरू नका. अनेकदा आपला मोबाईल फोन बंद करून रिस्टार्ट केला की त्यातील अनेक समस्या दूर होतात. त्यामुळे आपला फोन बंद करून काहीवेळ प्रतीक्षा करा आणि मग रिस्टार्ट करून आपला फोन पुन्हा चार्जला लावा.
Samsung Galaxy F16 5G: सॅमसंगचा लेटेस्ट स्मार्टफोन लाँच; किंमत 14 हजाराहून कमी; सोबतच ऑफरही सुरु
चार्जिंग केबल खराब तर नाही
अनेक वेळा आपल्याला माहित नसते की आपला चार्जर खराब होऊ शकतो, ज्यामुळे डिव्हाइसला चार्ज होण्यापासून रोखत असतो. हे तपासण्यासाठी, प्रथम चार्जरला दुसऱ्या डिव्हाइसमध्ये प्लग करा आणि ते काम करत आहे की नाही ते पहा. नसल्यास, तुमच्या स्मार्टफोन ब्रँडच्या स्टोअरमध्ये जा आणि ओरिजनल केबल खरेदी करा.
चार्जिंग पोर्ट स्वछ करा
चार्जिंग पोर्टमध्ये धूळ आणि घाण साचल्यामुळे स्मार्टफोनची बॅटरी चार्ज होत नाही. चार्जिंग पोर्ट वारंवार साफ करत राहा, पण त्यात कोणतेही लिक्विड टाकू नका. मऊ कापडाने ते स्वच्छ करण्याचा प्रयत्न करा. या स्टेप्स फॉलो करुनही जर तुमचा स्मार्टफोन चार्ज होत नसेल तर त्वरित सर्व्हिस सेंटर गाठा आणि आपला चार्जर तपासून घ्या.