Samsung Galaxy F16 5G
सॅमसंग कंपनीने आला नवीनतम स्मार्टफोन Samsung Galaxy F16 5G नुकताच लाँच केला आला. तुम्ही स्वस्तात एक उत्तम आणि दर्जेदार स्मार्टरफोन खरेदी करण्याच्या विचारात असाल तर हा स्मार्टफोन तुमच्यासाठी एक उत्तम पर्याय ठरेल. या बजेट स्मार्टफोनमध्ये अनेक दमदार फीचर्स देण्यात आले आहेत. आज आपण या लेखात स्मार्टफोनची किंमत आणि फीचर्स तसेच यावर उपलब्ध असेलेल्या ऑफरविषयी सविस्तर जाणून घेऊया.
Samsung Galaxy F16 5G मफध्ये MediaTek Dimensity 6300 प्रोसेसर, 128GB स्टोरेज आणि 50-मेगापिक्सेल ट्रिपल रिअर कॅमेरा युनिट आहे. कंपनीने आता या हँडसेटच्या तीन रॅम व्हेरियंटच्या किमती जाहीर केल्या आहेत. यासच यावरील ऑफर्सचीही माहिती देण्यात आली आहे. हा फोन सध्या कंपनीच्या अधिकृत वेबसाइट आणि फ्लिपकार्टद्वारे देशात खरेदीसाठी उपलब्ध आहे. हँडसेट Android 15 आधारित One UI 7 सह येतो आणि त्याला 6 OS अपग्रेड्स तसेच 6 वर्षांची सिक्याॅरिटी अपडेट्स मिळतील. Galaxy F16 5G हा मागील Galaxy F15 5G चा सक्सेसर आहे.
Aadhaar Biometric Lock: आपल्या Aadhaar Card ला लॉक कसे करावे? खूप सोपी आहे प्रोसेस
किंमत आणि ऑफर्स
याच्या किमितीविषयी बोलणे केले तर, Samsung Galaxy F16 5G ची भारतातील किंमत 4GB रॅम पर्यायासाठी 13,499 रुपयांपासून सुरू होते. तर, 6GB आणि 8GB रॅम वेरिएंटची किंमत अनुक्रमे 14,999 रुपये आणि 16,499 रुपये आहे. तिन्ही प्रकारांमध्ये 128GB स्टोरेज आहे. हा फोन देशात फ्लिपकार्ट आणि सॅमसंग इंडियाच्या वेबसाइटवरून खरेदी करता येईल. हा स्मार्टफोन ब्लिंग ब्लॅक, ग्लॅम ग्रीन आणि व्हायबिंग ब्लू या कलर ऑप्शनमध्ये उपलब्ध आहे. कंपनी सध्या अधिकृत ई-स्टोअरवरून Samsung Galaxy F16 5G च्या खरेदीवर रु. 1,000 ची इंस्टंट डिस्काउंट सूट देत आहे. SBI आणि Axis बँक ग्राहकांना अतिरिक्त रुपयांची सूट मिळू शकते. खरेदीदारांसाठी 6 महिन्यांचा नो-कॉस्ट EMI पर्याय देखील आहे, जो 2,078.48 रुपयांपासून सुरू होतो.
Samsung Galaxy F16 5G चे फीचर्स
Samsung Galaxy F16 5G मध्ये 90Hz रिफ्रेश रेटसह 6.7-इंच फुल-एचडी+ (1,080 x 2,340 पिक्सेल) सुपर AMOLED डिस्प्ले आहे. हे MediaTek Dimensity 6300 प्रोसेसरने पावर्ड आहे, ज्यामध्ये 8GB पर्यंत RAM आणि 128GB ऑनबोर्ड स्टोरेज प्रदान केले आहे. फोन Android 15 सह One UI 7 स्किनवर चालतो आणि 6 OS अपग्रेड आणि 6 वर्षांचे सिक्याॅरिटी अपडेट्स मिळण्याची गॅरंटी आहे.
फोटोग्राफीबद्दल बोलायचे झाल्यास, Samsung Galaxy F16 5G मध्ये ट्रिपल रिअर कॅमेरा युनिट आहे, ज्यामध्ये 50-मेगापिक्सलचा प्राथमिक सेन्सर, 5-मेगापिक्सलचा अल्ट्रावाइड शूटर आणि 2-मेगापिक्सलचा मॅक्रो सेन्सर आहे. सेल्फी आणि व्हिडिओ कॉलसाठी समोर 13-मेगापिक्सेल सेन्सर प्रदान करण्यात आला आहे. Samsung Galaxy F16 5G मध्ये 5,000mAh बॅटरी आहे, जी 25W वायर्ड फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते. हे 5G, 4G, Wi-Fi, Bluetooth 5.3, GPS, Glonass, Beidou, Galileo, QZSS आणि USB Type-C कनेक्टिव्हिटीसह येते. त्याची परिमाणे 164.4 x 77.9 x 7.9 मिमी आणि वजन 191 ग्रॅम आहे.