बटाट्याची भाजी खायला सगळ्यांचं आवडते. यापासून अनेक वेगवेगळे पदार्थ बनवले जातात. बटाटा वडा, आलू चाट, सँडविच इत्यादी अनेक पदार्थ बनवले जातात. पण कोणत्याही पदार्थांसोबत बटाट्याचे सेवन केल्यास शरीराला हानी पोहचण्याची शक्यता असते. चुकीच्या पदार्थांसोबत बटाटा खाल्यास गॅस, पोट फुगणे, अपचन इत्यादी अनेक समस्या उद्भवू लागतात. बटाट्यामध्ये स्टार्चचे प्रमाण अधिक असते, ज्यामुळे पचनक्रिया मंदावते आणि खाल्ले अन्नपदार्थ सहज पचन होत नाही. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला बटाट्यासोबत कोणत्या पदार्थांचे सेवन करू नये, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत.(फोटो सौजन्य – istock)
बटाट्यासोबत चुकूनही करू नका 'या' पदार्थांचे सेवन!
बटाट्यासोबत मांसाहारी पदार्थांचे अजिबात सेवन करू नये. यामुळे पचनक्रियेवर अतिरिक्त तणाव येतो. बटाट्यातील स्टार्च आणि मांसाहारी पदार्थांमधील प्रथिने एकत्र पचन होत नाहीत. ज्याचा आरोग्यावर गंभीर परिणाम होण्याची शक्यता असते.
दूध किंवा दह्यासोबत बटाट्याचे अजिबात सेवन करू नये. यामुळे पचनक्रिया पूर्णपणे बिघडून जाते. अॅसिडिटी आणि गॅस झाल्यानंतर वारंवार उलट्या किंवा मळमळ जाणवते.
जेवणातील पदार्थ बनवताना बऱ्याचदा बटाटा आणि डाळी एकत्र शिजवल्या जातात. यामुळे पोटात गॅस होणे, पोट फुगणे, उलट्या, मळमळ इत्यादी अनेक गंभीर समस्या उद्भवू लागतात.
बटाट्याची भाजी किंवा बटाट्यापासून बनवलेल्या पदार्थांचे सेवन केल्यानंतर चुकूनही गोड पदार्थ लगेच खाऊ नये. यामुळे रक्तातील साखरेची पातळी झपाट्याने वाढते आणि आरोग्य बिघडण्याची शक्यता असते.
टोमॅटो, सिमला मिरची किंवा वांगी इत्यादी भाज्या बनवताना बटाटा अजिबात वापरू नये. यामुळे अन्ननलिकेमध्ये पित्त तयार होते, ज्यामुळे ऍसिडिटी किंवा अपचन होण्याची शक्यता असते.