(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)
भारताची “देसी गर्ल”, प्रियांका चोप्रा परदेशातुन नुकतीच भातात आली आहे. नवरात्रीनिमित्त ती थेट काजोल आणि राणी मुखर्जीच्या दुर्गा पंडालमध्ये देवी दुर्गेचा आशीर्वाद घेण्यासाठी पोहचली. अभिनेत्रीने तिथे असे काही केले जे पाहून चाहते चकीत झाले आणि आता तीच कौतुक करत आहेत. प्रियांका दुर्गा पंडालमध्ये एथनिक लूकमध्ये आली आणि तिच्या लूकने सर्वांचे लक्ष वेधले. तिने केवळ देवीचे आशीर्वाद घेतले नाहीत तर तिला आमंत्रित करणाऱ्या तिच्या मित्रांचेही विशेष आभार मानले.
निक जोनासशी लग्न केल्यानंतर, प्रियांका चोप्रा आता परदेशात स्थायिक झाली आहे, परंतु ती अनेकदा कामासाठी आणि तिच्या पालकांच्या घरी भेट देण्यासाठी भारतात येते. ती जेव्हाही भेट देते तेव्हा ती अनेकदा तिच्या स्टाईलने प्रसिद्धी मिळवते. आता तिचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे ज्यामध्ये तिने असे काही केले आहे ज्याची चर्चा रंगली आहे.
अविका गोर आणि मिलिंद चांदवानी लग्नासाठी सज्ज; अभिनेत्रीचा वधूच्या लेहंग्यावरील फोटो आला समोर
प्रियांका राणी मुखर्जी आणि काजोलच्या दुर्गा पंडालमध्ये पोहचली
प्रियांका एका कार्यक्रमासाठी भारतात आली होती, परंतु नवरात्रीमुळे ती दुर्गा पंडालला भेट देण्यास टाळू शकली नाही आणि यासाठी तिने नेहमीप्रमाणे देसी लूक स्वीकारला. तिने उत्तर मुंबईतील राणी मुखर्जी आणि काजोलच्या दुर्गा पंडाललाही भेट दिली, जिथे तिचे चाहते तिच्या स्टाईलने आनंदित झाले. प्रियांका फक्त काही मिनिटांसाठी दुर्गा पंडालला भेट दिली आणि त्या काही मिनिटांत तिने सर्वांचे लक्ष वेधून घेतले.
तनिषाने अयान मुखर्जीसोबत दिली पोझ
प्रियांका दुर्गा पूजा पंडालमध्ये येताच, अयानने तिचे स्वागत केले आणि तिला आत घेऊन गेला. त्यानंतर देसी गर्लने मुखर्जी कुटुंबासोबत फोटो काढले. तिने काजोलची बहीण तनिषा मुखर्जी आणि अयान मुखर्जीसोबतही पोज दिली. या दोघांचे तिने आभार देखील मानले. प्रियांकाचा आता हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हूरल होत आहे.
गौतमी पाटीलच्या कारने रिक्षाला दिली मोठी धडक; पुण्यामधून अपघाताचे PHOTOS व्हायरल
आजही देसी गर्लचे आकर्षण अबाधित आहे
प्रियांका येथे एका चमकदार निळ्या रंगाच्या सूटमध्ये आली होती, जी तिच्या नेहमीच्या देसी गर्ल लूकची झलक देत होती. तिची स्टाईल नेहमीप्रमाणेच उत्कृष्ट होती. प्रियांकाने कपाळात सिंदूर आणि डोक्यावर पदर घेतला होता. अष्टमीच्या निमित्ताने प्रियांका चोप्राने प्रथम देवी दुर्गेची पूजा केली. तिने डोक्यावर दुपट्टा बांधला आणि देवी दुर्गेचा आशीर्वाद घेण्यासाठी नतमस्तक झाले. तिच्या देसी अवताराने चाहत्यांना मोहित केले, ज्यांचे म्हणणे आहे की प्रियांकाचा देसी गर्ल आकर्षण आजही कायम आहे.