X वर लाँच झालं नवीन फीचर (फोटो सौजन्य- pinterest)
सोशल मिडीयावर लोकं मोठ्या प्रमाणात सक्रीय असतात. प्रत्यक्षात एखाद्या व्यक्तिला भेटून तिच्यासोबत संवाद साधण्यापेक्षा सोशल मिडीयावर त्या व्यक्तिसोबत बोलणं लोकांना अधिक सोयीस्कर वाटतं. सोशल मिडीयाची लोकप्रियता दिवसेंदिवस प्रचंड वाढत आहे. तसेच नवनवीन सोशल मिडीया ॲप्स देखील लाँच केले जात आहेत. एकाच व्यक्तिचे अनेक सोशल मिडीया प्लॅटफॉर्मवर अकाऊंट असू शकतात. अनेक वेळा लोक त्यांच्या वेगवेगळ्या सोशल मीडिया अकाउंटचे पासवर्ड विसरतात. किंवा काही वेळा पासवर्ड हॅक होतात ज्यामुळे लोकांना खूप त्रास होतो.
हेदेखील वाचा- WhatsApp Alert! तुम्हालाही WhatsApp वर स्कॅमर्सकडून मॅसेज येत असतील तर सावध व्हा; नाहीतर होईल मोठं नुकसान
लोकांची पासवर्ड समस्या लक्षात घेत आता अनेक कंपन्या त्यांच्या युजर्ससाठी नवीन फीचर्स आणण्याच्या तयारीत आहेत. सोशल मिडीया प्लॅटफॉर्म X ने आपल्या Android युजर्ससाठी एक नवीन फीचर लाँच केलं आहे. Pass-Key असं या नवीन फीचरचं नाव आहे. या फीचरच्या मदतीने आता पासवर्ड विसरण्याची भीती संपणार आहे. Pass-Key फीचरच्या मदतीने तुम्ही पासवर्डशिवाय X अकाऊंटवर लॉग इन करू शकणार आहात.
हेदेखील वाचा- Mark Zuckerberg ने तयार केला त्याच्या पत्नीचा 7 फूट उंचीचा पुतळा; मानसशास्त्रज्ञांनी दिली धोक्याची घंटा
Pass-Key एक डिजिटल सुरक्षा तंत्रज्ञान आहे, जी पासवर्डच्या जागी काम करते. या अंतर्गत, कोणत्याही वेबसाइट किंवा ॲपवर लॉग इन करण्यासाठी युजर्सना पासवर्ड लक्षात ठेवण्याची आवश्यकता नाही. Pass-Key एक विशेष क्रिप्टोग्राफिक Key वापरते जी त्या युजर्ससाठी अद्वितीय असते. सोप्या भाषेत सांगायचं झालं तर, या फीचरच्या मदतीने तुम्ही पासवर्डशिवाय तुमच्या कोणत्याही सोशल मीडिया अकाउंटवर लॉग इन करू शकता. Pass-Key फीचर तुमचा बायोमेट्रिक डेटा वापरते जसे की तुमचे फिंगरप्रिंट किंवा फेस रेकग्निशन. हे फीचर Android यूजर्ससाठी X वर लाँच करण्यात आलं आहे.
Pass-Key फीचरमुळे युजर्सचे फिशिंगपासून संरक्षण होते. फिशिंग ही एक प्रक्रिया आहे ज्यामध्ये युजर्सची संवेदनशील माहिती फसवणूक करून चोरली जाते. Pass-Key फिशिंगपासून संरक्षण प्रदान करते कारण युजर्सला लिंकवर क्लिक करण्याची किंवा चुकीच्या वेबसाइटवर त्यांचे क्रेडेन्शियल्स प्रविष्ट करण्याची आवश्यकता नसते.






