YouTube Down: भारत, अमेरिकेसह अनेक देशांत व्हिडीओ स्ट्रिमिंग प्लॅटफॉर्म डाऊन! ‘Something Went Wrong’ मुळे वाढली युजर्सची डोकेदुखी
व्हिडीओ स्ट्रिमिंग प्लॅटफॉर्म युट्यूब डाऊन झाले आहे. अनेक यूजर्सनी तक्रार केली आहे, की युट्यूब अचानक बंद झाले आणि स्क्रिनवर समथिंग वेंट राँग असा मेसेज दिसू लागला. यामुळे यूजर्स प्रचंड हैराण झाले होते. काही यूजर्सना मंगळवारी रात्री 8:13 वाजल्यानंतर ही समस्या येत होती. तर काही यूजर्सनी तक्रार केली आहे की, त्यांना आज बुधवारी सकाळी युट्यूबवर व्हिडीओ पाहण्यात समस्या येऊ लागली. याबाबत अनेक यूजर्सनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर तक्रार केली आहे. तर काही यूजर्सनी मिम्स देखील शेअर केले आहेत.
Downdetector ने शेअर केलेल्या पोस्टनुसार, वापरकर्त्यांच्या अहवालांमध्ये रात्री 8:13 वाजता EST पासून युट्यूब टीव्हीमध्ये समस्या येत असल्याचे दिसून आले आहे. म्हणजेच अमेरिकेतील वेळेनुसार, रात्री 8:13 वाजल्यापासून या समस्या येऊ लागल्या आहेत. युट्यूब आऊटेज केवळ अमेरिकेपुरते मर्यादित नव्हते. तर याचा परिणाम भारतासह इतर अनेक देशांमध्ये देखील पाहायला मिळाला. (फोटो सौजन्य – Pinterest)
🚨 YouTube App is DOWN worldwide (Web working fine) Users report:
• Home page errors
• App not loading videos Are you facing it on Android or iOS? 👀 pic.twitter.com/7m374sLmi3 — Abhishek Yadav (@yabhishekhd) February 18, 2026
BREAKING: Google and YouTube is down. 𝕏 is up! pic.twitter.com/XdvFySgxed — DogeDesigner (@cb_doge) February 18, 2026
Everybody running to Twitter to see why YouTube is down #youtubedown pic.twitter.com/vxMuoX8gDE — Luciano Lucas (@tharealluciano) February 18, 2026
युट्यूबने सोशल मीडिया पोस्ट शेअर करत या संपूर्ण प्रकरणाबद्दल मााहिती दिली आहे. पोस्टमध्ये सांगण्यात आलं आहे की, कंपनीची टिम याप्रकरणी काम करत आहे आणि लवकरच ही समस्या सोडवली जाऊ शकते. याबाबत अधिक माहिती शेअर केली जाईल.
आउटेज ट्रॅकिंग वेबसाईट Downdetector ने शेअर केलेल्या आकडेवारीनुसार, अमेरिकेत युट्यूब डाऊन झाल्यामुळे हजारो रिपोर्ट दाखल करण्यात आले. यासोबतच यूजर्सना इतर प्लॅटफॉर्म्सचा वापर करण्यात देखील अडचण येत होती. गुगलच्या अनेक सेवांवर देखील परिणाम झाल्याचे समोर येत आहे. युजर्सना गुगल ट्रांसलेट वापताना अडचणी येत आहेत. गुगससंबंधित 2600 तक्रारी प्राप्त झाल्या आहेत.






