फोटो सौजन्य - इंस्टाग्राम
सध्या आपण अनेक गोष्टींसाठी AI ची मदत घेतो. फोनमधील अनेक App मध्ये AI चा समावेश असतो. App मधील AI द्वारे आपल्याला कोणत्याही प्रश्नांचं उत्तर शोधणं अगदी सहज सोप होतं. केवळ फोनमध्येच नाही तर अनेक कामांसाठी देखील AI मॉडेल्सची मदत घेतली जाते. एका जागतिक कंपनीने AI ROBOT ‘मिका’ची त्यांच्या कंपनीमध्ये CEO म्हणून निवड केली होती. त्यानंतर आता जगातील AI मॉडेल्ससाठी सौंदर्य स्पर्धेचे आयोजन करण्यात आलं आहे. ब्रिटनच्या फॅनव्ह्यू कंपनीने वर्ल्ड एआय क्रिएटर अवॉर्डच्या सहकार्याने जगातील पहिल्या AI मॉडेल्स सौंदर्य स्पर्धेचे आयोजन केले आहे. या सौंदर्य स्पर्धेची सोशल मिडीयावर चर्चा आहे. या स्पर्धेसाठी १५०० मॉडेल्सनी सहभाग घेतला होता. त्यातील टॉप १० मॉडेल्सची निवड करण्यात आली आहे. या टॉप १० मॉडेल्समध्ये भारताची AI मॉडेल झारा शतावरीचा देखील समावेश आहे.
ब्रिटनच्या फॅनव्ह्यू कंपनीने वर्ल्ड एआय क्रिएटर अवॉर्डच्या सहकार्याने जगातील पहिल्या AI मॉडेल्स सौंदर्य स्पर्धेचे आयोजन केले आहे. या स्पर्धेसाठी टॉप १० मॉडेल्सची निवड करण्यात आली आहे. या स्पर्धेत २ AI परिक्षक असतील. तसेच जनसंपर्क सल्लागार अँड्र्यू ब्लॉच आणि व्यावसायिक महिला सॅली ॲन-फॉसेट या सौंदर्य स्पर्धेत परीक्षक म्हणून उपस्थित राहणार आहेत. स्पर्धेच्या शेवटी ३ मॉडेल्सची निवड करण्यात येईल. मिस AI बनलेल्या मॉडेलला १०.८४ लाख रुपयांचे बक्षीस दिले जाणार आहे. या स्पर्धेसाठी निवडण्यात आलेल्या टॉप १० मॉडेल्समध्ये भारताची AI मॉडेल झारा शतावरीचा देखील समावेश आहे.
मोबाईल ॲड एजन्सीचे सह-संस्थापक राहुल चौधरी यांनी AI मॉडेल झारा शतावरी तयार केले आहे. झाराचा टॉप १० मॉडेल्समध्ये समावेश झाल्याची माहिती राहुल चौधरी यांनी त्यांच्या सोशल मिडीया अकाऊंटवरून दिली आहे. या यशाबद्दल अनेकांनी राहुल चौधरी यांचे अभिनंदन केले आहे. झाराचे सोशल मिडीयावर पेज देखील आहे. AI मॉडेल झाराला खाद्यपदार्थ, प्रवास आणि फॅशनची आवड आहे. ती तिच्या सोशल मिडीया पेजवरून आरोग्य, शिक्षण आणि फॅशनशी संबंधित माहिती शेअर करते.