Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 1 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

अखेर तो क्षण आलाच! नव्या स्मार्टफोनसह Infinix चा भारतात धमाका; पावरफुल स्नॅपड्रॅगन प्रोसेसरसह मिळणार हे खास फीचर्स

Infinix Note 60 Pro Launched: ई कॉमर्स प्लॅटफॉर्म फ्लिपकार्ट आणि कंपनीच्या ऑनलाईन स्टोअरद्वारे ग्राहक हा स्मार्टफोन खरेदी करू शकणार आहेत. तीन कलर ऑप्शन आणि दोन स्टोरेज व्हेरिअंटमध्ये नवा स्मार्टफोन लाँच केला आहे.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Apr 13, 2026 | 02:59 PM
अखेर तो क्षण आलाच! नव्या स्मार्टफोनसह Infinix चा भारतात धमाका; पावरफुल स्नॅपड्रॅगन प्रोसेसरसह मिळणार हे खास फीचर्स

अखेर तो क्षण आलाच! नव्या स्मार्टफोनसह Infinix चा भारतात धमाका; पावरफुल स्नॅपड्रॅगन प्रोसेसरसह मिळणार हे खास फीचर्स

Follow Us
Follow Us:
  • Infinix Note 60 Pro लाँच – ₹31,999 पासून किंमत, फ्लिपकार्ट आणि अधिकृत स्टोअरवर 20 एप्रिलपासून विक्री सुरू
  • दमदार डिस्प्ले आणि परफॉर्मन्स – 6.78-इंच AMOLED, 144Hz रिफ्रेश रेट आणि Snapdragon 7s Gen 4 चिपसेट
  • पॉवरफुल कॅमेरा व बॅटरी – 50MP कॅमेरा (OIS) + 6500mAh बॅटरी, 90W वायर्ड आणि 30W वायरलेस फास्ट चार्जिंग सपोर्ट
Infinix Smartphone Launched: टेकप्रेमींना गेल्या अनेक दिवसांपासून ज्या क्षणाची प्रतिक्षा होती, तो क्षण आता अखेर आला आहे. टेक कंपनी Infinix ने भारतात त्यांचा आणखी एक नवीन स्मार्टफोन लाँच केला आहे. कंपनीच्या नव्या डिव्हाईसने भारतात Infinix Note 60 Pro नावाने एंट्री केली आहे. टेक कंपनीने त्यांच्या Note 60 लाइनअप अंतर्गत हा नवीन स्मार्टफोन लाँच केला आहे. नव्या स्मार्टफोनचे आकर्षण म्हणजे दमदार फीचर्स आणि स्टायलिश डिझाईन. कंपनीने त्यांच्या नव्या डिव्हाईसला आयफोन 17 प्रो सारखा लूक देण्याचा प्रयत्न केला आहे. मिड रेंज किंमतीत सादर करण्यात आलेल्या या स्मार्टफोनमध्ये दमदार फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स देण्यात आले आहेत. फोनच्या मागील पॅनलवर ॲक्टिव्ह मॅट्रिक्स डिस्प्ले आहे, जो नोटिफिकेशन्स आणि इतर माहिती दाखवतो.

WhatsApp Update: आता वेब यूजर्सही निवडू शकतात आवडती चॅट थीम! मिळणार नवे रंग आणि वॉलपेपर, जाणून घ्या

Infinix Note 60 Pro ची किंमत आणि उपलब्धता

Infinix Note 60 Pro च्या 8GB रॅम आणि 128GB स्टोरेज या बेस व्हेरिअंची किंमत 31,999 रुपये ठेवण्यत आली आहे. तर 8GB + 256GB हे व्हेरिअंट 34,999 रुपयांच्या किंमतीत लाँच करण्यात आले आहे. कंपनी या स्मार्टफोनच्या खरेदीवर काही खास बँक ऑफर्स देखील देत आहे. ग्राहक एसबीआय, आयसीआयसीआय बँक, येस बँक, बँक ऑफ बडोदा आणि आयडीएफसी बँकेच्या कार्डांवर 3,000 रुपयांपर्यंतची त्वरित सूट मिळवू शकतात. तसेच 12 महिन्यांपर्यंत ग्राहकांना नो-कॉस्ट ईएमआय पर्याय देखील मिळणार आहे. स्मार्टफोनची विक्री 20 एप्रिलपासून सुरु होणार आहे. ग्राहक फ्लिपकार्ट आणि इन्फिनिक्सच्या ऑनलाईन स्टोअरवरून स्मार्टफोन खरेदी करू शकतात. Infinix Note 60 Pro डीप ओशन ब्लू, मोचा ब्राऊन आणि सोलर ऑरेंज रंगात खरेदीसाठी उपलब्ध आहे. (फोटो सौजन्य – Infinix) 

Infinix Note 60 Pro चे स्पेसिफिकेशन्स आणि फीचर्स

डिस्प्ले

डिव्हाईसमध्ये 6.78-इंच 1.5K (1,208×2,644 पिक्सेल) एलटीपीएस अमोलेड डिस्प्ले देण्यात आला आहे. तसेच हे डिव्हाईस 144Hz पर्यंत रिफ्रेश रेटला सपोर्ट करते. तसेच या लेटेस्ट लाँच स्मार्टफोनमध्ये 4,500 निट्सपर्यंत पीक ब्राइटनेस देखील देण्यात आली आहे. या डिव्हाइसमध्ये कॉर्निंग गोरिला ग्लास 7i चे संरक्षण देखील आहे. धूळ आणि पाण्यापासून संरक्षणासाठी याला IP64 रेटिंग आहे.

चिपसेट

नव्या स्मार्टफोनमध्ये कंपनीने क्वालकॉमचा 4nm ऑक्टा-कोर स्नॅपड्रॅगन 7s Gen 4 चिपसेट दिला आहे. डिव्हाईसमध्ये अ‍ॅड्रेनो ए 810 जीपीयू, 8 जीबी एलपीडीडीआर 5 रॅम, आणि 8GB पर्यंत व्हर्च्युअल रॅम एक्सपेंशन देखील मिळणार आहे. या फोनमध्ये 256GB पर्यंत UFS 2.2 स्टोरेज देखील मिळणार आहे.

Nubia च्या नव्या गेमिंग फोनची धडाकेबाज एंट्री! फीचर्सचा जलवा अन् बॅटरीची कमाल… किंमत सर्वसामान्यांच्या खिशाला परवडणारी

कॅमेरा

फोटोग्राफीसाठी कंपनीने त्यांच्या नव्या स्मार्टफोनमध्ये डुअल रियर कॅमेरा दिला आहे. ज्यामध्ये 50-मेगापिक्सेल (f/1.59) चा प्रायमरी कॅमेरा समाविष्ट आहे. या डिव्हाईसमध्ये ऑप्टिकल इमेज स्टेबिलाइजेशन (OIS), 78-डिग्रीचा फील्ड ऑफ व्यू आणि ऑटोफोकसची सुविधा देखील ऑफर करत आहे. फोनमध्ये 8-मेगापिक्सेल (f/2.2) चा अल्ट्रा-वाइड कॅमेरा देखील दिला आहे. स्मार्टफोनच्या समोरील बाजूला 13-मेगापिक्सेल (f/2.2) चा फ्रंट कॅमेरा आहे.

बॅटरी

याशिवाय लेटेस्ट लाँच डिव्हाईसमध्ये कंपनीने 90W वायर्ड आणि 30W वायरलेस फास्ट चार्जिंग सपोर्टसह 6,500mAh बॅटरी दिली आहे.

Web Title: Infinix note 60 pro smartphone launched in india in mid range segment read about features and specifications tech news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 13, 2026 | 02:59 PM

Topics:  

  • Infinix
  • smartphone
  • tech launch

संबंधित बातम्या

एक फोन, दोन स्क्रीन! Honorच्या नव्या स्मार्टफोनची सर्वत्र चर्चा… डिझाईन पाहून तुम्हीही म्हणाल, वाह! क्या बात है!!
1

एक फोन, दोन स्क्रीन! Honorच्या नव्या स्मार्टफोनची सर्वत्र चर्चा… डिझाईन पाहून तुम्हीही म्हणाल, वाह! क्या बात है!!

Redmiचा नवा स्मार्टफोन बाजारात दाखल! 6000mAh बॅटरी अन् 120Hz डिस्प्लेने वेधलं लक्ष… इतकी आहे किंमत
2

Redmiचा नवा स्मार्टफोन बाजारात दाखल! 6000mAh बॅटरी अन् 120Hz डिस्प्लेने वेधलं लक्ष… इतकी आहे किंमत

Samsung AI Smartphone: Samsung चा नवा Galaxy S26 FE बाजारात; स्लिम डिझाइनसह AI फीचर्सची मेजवानी
3

Samsung AI Smartphone: Samsung चा नवा Galaxy S26 FE बाजारात; स्लिम डिझाइनसह AI फीचर्सची मेजवानी

स्वस्त फोनच्या दुनियेत लावाचा नवा डाव! बजेट फ्रेंडली ग्राहकांसाठी आणला Lava Bold N4 Lite; फीचर्सची यादी पाहाच
4

स्वस्त फोनच्या दुनियेत लावाचा नवा डाव! बजेट फ्रेंडली ग्राहकांसाठी आणला Lava Bold N4 Lite; फीचर्सची यादी पाहाच

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.