युट्यूब क्रिएटर्ससाठी आलं नवीन फीचर! आता चॅनल शेअर करणं होणार अधिक सोपं (फोटो सौजन्य - pinterest)
व्हिडीओ शेअरिंग प्लॅटफॉर्म YouTube ने आपल्या युजर्ससाठी एक नवीन फीचर लाँच केलं आहे. हे फीचर YouTube क्रिएटर्ससाठी अतिशय फायदेशीर ठरू शकतं कारण ह्या फीचरच्या मदतीने क्रिएटर्स त्यांचा YouTube चॅनेल इतरांसोबच शेअर करण्यास सक्षम असतील ज्यामुळे त्यांच्या सबस्क्राईबर्सच्या संख्येत झपाट्याने वाढ होऊ शकते. हे नवीन फीचर म्हणजे तुमच्या YouTube वरील चॅनलचा QR कोड असेल.
हेदेखील वाचा- Google AI युट्युबर्सना मदत करणार! YouTube वरील अकाऊंट रिकव्हर करणं आता आणखी सोपं होणार
आता तुम्हाला तुमच्या YouTube चॅनेलचा QR कोड मिळणार आहे. हा QR कोड तुम्ही इतरांसोबत शेअर करून आपल्या सबस्क्राईबर्सची संख्या वाढवू शकता. तुम्ही शेअर केलेला QR कोड स्कॅन करताच पेजवर तुमचं YouTube चॅनल ओपन होईल. यामुळे तुमच्या चॅनेलवरील व्ह्यूज देखील वाढतील. YouTube क्रिएटर्स चॅनल शेअरिंगसाठी मदत व्हावी, याच उद्देशाने हे नवीन फीचर लाँच करण्यात आलं आहे. या नवीन फीचरसह, युजर्स त्यांचे चॅनल त्यांचे मित्र, कुटुंब आणि फॉलोअर्ससह शेअर करू शकतात. यासाठी इतर YouTube युजर्सना हा QR कोड स्कॅन करावा लागेल.
चॅनल शेअरिंगसाठी, YouTube युजर्स चॅनलच्या मुख्य पृष्ठावरून हा QR कोड ऍक्सेस करू शकतील. YouTube वापरकर्ता हा QR कोड सोशल मीडिया, मेसेजिंग ॲप्स आणि प्रीटेंड मटेरिअलवर शेअर करू शकतो. जेव्हा हा QR कोड दुसऱ्या YouTube वापरकर्त्याद्वारे फोनवरून स्कॅन केला जातो, तेव्हा त्या वापरकर्त्याला ऑटोमॅटिकली YouTube चॅनेलवर रिडायरेक्ट केले जाईल. या फीचरबद्दल माहिती देताना कंपनीने सांगितले की, आम्ही YouTube वर सर्व क्रिएटर कम्युनिटींसाठी QR कोड चॅनल लाँच करत आहोत. आम्हाला आशा आहे की या नवीन अपडेटमुळे तुम्ही तुमच्या चॅनेलला तुमचा कंटेट पाहू इच्छित लोकांसोबत सहज शेअर करू शकाल.
हेदेखील वाचा- YouTube Guidelines: YouTube ची नवीन मार्गदर्शक तत्व जारी; AI व्हिडीओसाठी बदलले नियम
तुम्ही YouTube क्रिएटर असाल आणि तुमच्या स्वतःच्या चॅनलवर व्हिडिओ अपलोड करत असाल, तर तुम्ही तुमच्या चॅनलचा QR कोड इतर YouTube युजर्ससोबत शेअर करू शकता-
आता हा QR कोड तुम्ही तुमच्या मित्र, नातेवाईक, कुटूंबियांसोबत शेअर करू शकता. यामुळे तुमच्या च्या सबस्क्राईबर्सच्या संख्येत झपाट्याने वाढ होऊ शकते. तसेच तुमच्या चॅनेलवरील व्ह्यूज देखील वाढतील.